धनू

    01-Mar-2026
Total Views |
 

Horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी उत्साह, शिकण्याचा व पुढे जाण्याची प्रेरणा देणारा राहील. तुमच्यात काही नवे करण्याची इच्छा प्रबळ होईल. दीर्घकाळापासून मनात चालणाऱ्या योजना अमलात आणण्याची संधी मिळेल. हा काळ सकारात्मक विचार व व्यापक दृष्टिकोन अवलंबण्याचा आहे.
 
नोकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमच्यासाठी कार्यक्षेत्रात नव्या संधी मिळू शकतात. जर आपण एखाद्या नव्या योजनेवर काम करीत असाल तर त्यात प्रगतीचे संकेत मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा विस्ताराच्या योजना बनवण्याचा आहे. आर्थिक स्थिती उत्तम असेल.
 
नातीगोती तुमच्या कौटुंबिक जीवनात सकारात्मक वातावरण राहील. जोडीदारासोबत एखाद्या प्रवासाची वा भविष्याची योजना आखू शकता. प्रेमसंबंधात विश्वास व समजुतदारपणा वाढेल. एखाद्या जुन्या मित्राच्या भेटीने मन प्रसन्न राहील. मुलांकडून एखादी आनंददायक माहिती मिळू शकते.
 
आरोग्य : आरोग्याबाबत हा आठवडा सामान्य राहील. पण जादा धावपळ थकवू शकते. मांड्या व कंबरेसंबंधित किरकोळ समस्या उद्भवू शकते. यासाठी व्यायामात संतुलन राखावे. नियमित दिनचर्या अवलंबावी व संतुलित आहार घ्यावा. ध्यान व प्राणायामाने मानसिक शांती लाभेल.
 
■ शुभदिनांक : ०१, ०४,०५
 
शुभरंग पिवळा, लाल,पांढरा
 
■ शुभवार रविवार, सोमवार, मंगळवार
 
■ दक्षता या आठवड्यात अतिउत्साहात कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नये. इतरांच्या भानगडीत नाक खुपसू नये.
 
उपाय : गुरुवारी श्रीविष्णूची पूजा करावी व ॐ नमो भावगते वासुदेवाय मंत्राचा जप करावा व केळी दान करावीत.