तुमच्यासाठी हा आठवडा संतुलन, समजुतदारपणा व निर्णयक्षमतेची परीक्षा घेणारा राहणार आहे. तुम्ही जीवनाच्या कुटुंब, करिअर व वैयक्तिक भावनांत संतुलन राखण्याचा प्रयत्न कराल. काही परिस्थिती तुम्हाला द्विधावस्थेत टाकू शकतात पण तुमचा कूटनैतिक विचार व शांत स्वभाव मार्ग काढील.
■ नोकरी-व्यवसाय या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुमच्या कार्यकुशलतेची प्रशंसा होऊ शकते. एखाद्या महत्त्वाच्या बैठक वा प्रोजेक्टमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची राहील. सहकर्मचाऱ्यांसोबत ताळमेळ राखावा. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा संतुलित राहील. भागीदारीत स्पष्ट संवाद राखावा.
■ नातीगोती या आठवड्यात तुमच्या नात्यांमध्ये माधुर्य राहील. जीवनसाथीसोबत भावनिक संबंध मजबूत होतील. कौटुंबिक विषयावर चर्चेने सकारात्मक परिणाम मिळू शकतात. प्रेमसंबंधात रोमँटिक वातावरण राहील. पण स्पष्टपणा आवश्यक आहे. मित्रांसोबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न राहील.
■ आरोग्य : आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील, पण मानसिक तणाव टाळायला हवा. कामाच्या जास्त ओझ्यामुळे थकवा जाणवू शकतो. योग, ध्यान व हलका व्यायाम अवलंबावा, खाण्या-पिण्यात संतुलन राखावे. गोड व तळकट पदार्थांपासून दूर राहावे. पुरेशी झोप घ्यावी.
■ शुभदिनांक : ०२, ०६, ०७
शुभरंग : आकाशी, निळा, काळा
■ शुभवार बुधवार, शुक्रवार, शनिवार
■ दक्षता या आठवड्यात आर्थिक व्यवहारात अंधविश्वास ठेवू नये. कायदेशीर व दस्ताऐवजी कामांमध्ये दक्षता बाळगावी. भावनिक निर्णय घेणे टाळावे...
■ उपाय या आठवड्यात लक्ष्मीमातेची पूजा करावी. आणि ॐ श्रीं महालक्ष्मै नमः मंत्राचा जप करावा. गरजूंना शुभ्र मिठाई वा वस्त्र दान करावे.