हा आठवडा तुमच्यासाठी आत्मविश्वास, नेतृत्वक्षमता व नव्या निर्णयांचा आहे. आपल्यात ऊर्जा व उत्साह राहील. दीर्घकाळापासून मनात असलेल्या योजनेला पुढे नेण्याची संधी मिळेल. या काळात तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी राहील. लोक तुमचे विचार गंभीरतेने ऐकतील. अहंकार टाळावा. नम्रतेने पुढे जावे.
■ नोकरी-व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वक्षमतेची परीक्षा होऊ शकते. तुमच्यावर एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा आठवडा लाभदायक असेल. गुंतवणुकीबाबत सावध राहावे. घाईत कोणताही निर्णय घेऊ नये.
नातीगोती : कुटुंबात तुमची भूमिका महत्त्वाची राहील. एखाद्या कौटुंबिक निर्णयात तुमचा सल्ला घेतला जाऊ शकतो. जीवनसाथीशी संबंध मधुर राहतील. पण सतत संवाद राखणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल पण धैर्य व समजुतदारपणाने वागावे. मित्रांच्या भेटीने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल...
■ आरोग्य : आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील. तशा तुम्ही तुमच्याशारीरिक हालचाली वाढवण्याची गरज आहे. हृदय व रक्तदाबासंबंधित समस्या असणाऱ्यांनी विशेष दक्षता बाळगावी. पुरेशी झोप घ्यावी तसेच मानसिक तणावापासून दूर राहावे. सूर्यनमस्कार व ध्यान लाभदायक ठरेल.
■ शुभदिनांक : ०१, ०४,०५
शुभरंग पिवळा, लाल, पांढरा
■ शुभवार रविवार, सोमवार, मंगळवार
■ दक्षता : या आठवड्यात अहंकाराने कोणाशीही वाद घालू नये. आर्थिक बाबतीत जोखीम घेण्यापूर्वी पूर्ण माहिती मिळवावी.
■ उपाय : रविवारी सूर्याला अर्घ्य द्याव व आदित्य हृदय स्तोत्र वाचावे. गरजूंना गहू वा गूळ दान द्यावा.