हा आठवडा तुमच्यासाठी भावनांचे, अंतर्ज्ञान व आध्यात्मिक प्रगतीचे संकेत देत आहे. तुमच्या मनात खोलवर विचार करण्याची प्रवृत्ती वाढेल. तुम्ही तुमच्या आजुबाजूचे वातावरण अधिक सूक्ष्मतेने जाणवाल. हा काळ स्वत:ला समजण्याचा व आंतरिक शक्ती ओळखण्याचा आहे.
■ नोकरी-व्यवसाय : या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुम्हाला धैर्य व एकाग्रतेची गरज असेल. एखाद्या प्रोजेक्टमध्ये संथपणे प्रगती होऊ शकते. परिणाम समाधानकारक असतील. वरिष्ठांशी नम्रतेने वागावे. व्यापाऱ्यांनी भागीत व देवघेवीत स्पष्टपणा ठेवावा. एखादी नवी संधी मिळू शकते.
■ नातीगोती: या आठवड्यात कुटुंबात भावनिक संबंध मजबूत होतील. जीवनसाथीसोबत माधुर्य राहील. आपसातील समज वाढेल. प्रेमसंबंधात संवेदनशीलता जास्त असेल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी कळू शकते. मित्रांसोबतच्या आध्यात्मिक सकारात्मक चर्चेने मनाला शांती लाभेल.
■ आरोग्य या आठवड्यात तुम्हाला तुमच्या तब्येतीबाबत सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला मानसिक ताण व अधिक विचारांमुळे थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण घ्यावी. दिनचर्या नियमित ठेवावी. पाय व जलतत्त्वासंबंधित समस्या होऊ शकतात. यासाठी स्वच्छ व संतुलित आहार घ्यावा.
■ शुभदिनांक : ०१, ०४०५ शुभरंग पिवळा, लाल, पांढरा
■ शुभवार रविवार, सोमवार, मंगळवार
■ दक्षता या आठवड्यात भावनेच्या भरात कोणताही आर्थिक वा वैयक्तिक निर्णय घेऊ नये..
■ उपाय : या आठवड्यात गुरुवारी श्रीविष्णूची पूजा करावी व ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करावा. गरजूंना पिवळी वस्तू वा केळी दान करावीत.