ज्यांना तुम्हांला पटवून सांगायचे आहे अशा व्यक्तीचे नाव संभाषणाच्या मध्येच घ्या. विशेषतः ज्या व्यक्ती तुमच्या फार जवळच्या नाहीत त्यांच्याबाबत ही युक्ती चालते. कारण लाेकांना वाटते की, त्यांच्या गरजेची दखल घेतली गेली आहे. एकदा त्यांची तशी भावना झाली की ते तुमच्याशी असहमत हाेणे श्नय नसते.खांद्यावर हात ठेवणे. वरीलप्रमाणेच यामागील कारण आहे. मात्र भारतीय संस्कृतीत वयाने ज्येष्ठ असणारी व्यक्ती लहान वयाच्या खांद्यावर हात ठेवू शकते. वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीने तसे केल्यास ते उद्धटपणाचे मानले जाते. खांद्यावर हात ठेवणे याचा अर्थ त्या व्यक्तीला विश्वास देणे, खात्री देणे असे मानले जाते. जेव्हा एखाद्याला पटवून सांगायचे असते तेव्हा बाेलताना तुम्ही अधूनमधून सकारात्मक मान हलवली तर तुमचे खरे मानून स्वीकारले जाण्याची श्नयता जास्त असते.
जेव्हा तुम्ही काहीतरी महत्त्वाचे सांगत असता तेव्हा थेट त्या व्यक्तीच्या डाेळ्यात पहा आणि नजर हटवू नका. (पापण्यांची नैसर्गिक उघडझाप हाेऊ द्या. अन्यथा ते मनाेरुग्णाप्रमाणे दिसेल.) तुमच्यासाठी एखादी व्यक्ती काम करत असेल तर ते किती प्रभावीपणे चालू आहे असे सांगून त्या व्यक्तीला शुभेच्छा द्या. ही जगातील सर्वात जुनी युक्ती आहे. मात्र यामध्ये त्या व्यक्तीला कामाबाबत प्रश्न विचारता येत नाही. लाेकांना त्यांच्या काैशल्याबद्दल विचारा. प्रत्येकालाच स्वतःबद्दल सांगायला आवडते. त्यातून मग तुमचे काम हाेण्यास मदत हाेते.मिट राेम्नी यांच्याशी ओबामा यांची डिबेट चालू हाेती.
त्यावेळी राेम्नी पेन्शनविषयी प्रश्न विचारत असताना ओबामा जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत हाेते. हसत हाेते. त्यामुळे राेम्नी यांना पुन्हा प्रश्न विचारावा लागत हाेता. एखाद्यावर वर्चस्व गाजवण्याचे हे अफलातून तंत्र आहे. त्यातून असे चित्र निर्माण झाले की, ओबामा यांनी आपल्याकडे लक्ष द्यावे यासाठी राेम्नी याचना करत आहेत.कुणाला तरी वादात जिरवण्यासाठीचे हे तंत्र आहे.जेव्हा एखादा त्याचे बाेलणे संपवताे तेव्हा त्यावर काहीही उत्तर न देणे किंवा कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त न करणे. मग श्नयता अशी असते की समाेरची व्यक्ती नकाेशी वाटणारी शांतता संपवण्यासाठी बाेलत राहते आणि त्यातून असे दिसून येते की, आता त्या व्यक्तीचे चर्चेवर नियंत्रण नाही.