मिथुन

    01-Mar-2026
Total Views |

Horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी सक्रियता व नव्या संधींचे संकेत घेऊन येत आहे. तुमच्या मनात अनेक नवे विचार जन्म घेतील व तुम्ही ते साकारण्याच्या दृष्टिने पुढे जाल. हा काळ तुमचे कौशल्य उजळण्याचा व आत्मविश्वास मजबूत करण्याचा आहे. तुमचे बोलणे व हुशारी विशेष प्रभावी ठरेल.
 
■ नोकरी-व्यवसाय या आठवड्यात कार्यक्षेत्रात तुमची प्रतिभा उजळून पुढे येईल. एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्ट वा सादरीकरणात यश मिळू शकते. सहकर्मचाऱ्यांसोबत ताळमेळ ठेवावा. कारण टीमवर्कनेच मोठे लक्ष्य गाठता येईल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ नेटवर्किंग व नव्या संपकांचा आहे.
 
■ नातीगोती या आठवड्यात तुमच्या कुटुंबात हसरे खेळकर वातावरण राहील. भावा-बहिणींसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. जीवनसाथीशी एखाद्या प्रवास वा भविष्याची चर्चा होऊ शकते. प्रेमसंबंधात माधुर्य राहील. पण कोणतेही दुटप्पी बोलणे वा लपवाछपवी टाळावी.
 
■ आरोग्य : आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील, पण जादा धावपळीमुळे थकवा जाणवेल. नियमित दिनचर्या अवलंबावी व पुरेशी विश्रांती घ्यावी. तसेच खाण्या-पिण्यावर ताबा ठेवावा. योग, प्राणायाम व हलका व्यायाम फायदेशीर ठरेल. मानसिक शांतीसाठी ध्यान करावे. सकारात्मक विचारकरावा.
 
■ शुभदिनांक : ०२, ०६, ०७
 
शुभरंग : आकाशी, निळा, काळा 
 
शुभवार बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
■ दक्षता : कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. नात्यांत अनावश्यक वादटाळावा.
 
■ उपाय : बुधवारी श्रीगणेशाची पूजा करावी व दुर्वा अर्पण करावी. ॐ गं गणपतये नमः मंत्राचा १०८ वेळा जप करावा. गरजूंना हिरवी वस्तू दान द्यावी.