तुमच्यासाठी हा आठवडा जबाबदारी, शिस्त व भरीव निर्णयांचा असणार आहे.तुम्ळी तुमच्या लक्ष्यांबाबत गंभीर राहाल व प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. हा कळा घाई टाळून याेजनाबद्ध पद्धतीने पुढे जाण्याचा आहे. जुने अनुभव या आठवड्यात तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील.
नाेकरी-व्यवसाय : कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याचे संकेत आहेत. वरिष्ठ तुमच्या समपर्णण व कार्यकुशलतेने प्रभावित हाेऊ शकतात. एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्या खांद्यांवर येऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा संतुलित आहे. गुंतवुकीबाबत सावध राहून दीर्घकालीन याेजनांकडे लक्ष द्यावे.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्यावर काैटुंबिक जबाबादारी वाढेल. घरात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा हाेईल.जीवनसाथीसाेबत परस्पर सामंजस्य उत्तम असेल. जुन्या मित्रांची भेट वा संवाद झाल्यामुळे मन प्रसन्न राहील.कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकताे.
आराेग्य : हा आठवडा तुमच्यासाठी सामान्य राहणार आहे. परंतु तुम्ही मानसिक तणावापासून दूर राहायला हवे. अनियमित दिनचर्येमुळे तुम्हाला थकवा जाणवू शताे. पुरेशी झाेप घ्यावी व याेग-ध्यान अवलंबावे. रक्तदाब व नसांशी संबंधित समस्यांत सावध राहावे. संतुलित आहार घ्यावा.
शुभदिनांक : 02, 06, 07
शुभरंग : आकाशी, निळा, काळा
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात काेणत्याही कामात कठाेर धाेरण अवलंबणे टाळावे.आर्थिक बाबतीत जाेखीम घेऊ नये.
उपाय : शनिवारी शनिदेवाची पूजा करावी व ॐ शं शनैश्चराय नम: मंत्राचा जप करावा. गरजूंना काळे तीळ वा लाेखंड दान करावे..