हा आठवडा तुमच्यासाठी भावनिक संतुलन व कौटुंबिक प्राथमिकतेवर लक्ष देण्याचा आहे. मन काहीसे भावुक राहू शकते यामुळे किरकोळ गोष्टी मनाला लावून घेणे टाळावे. हा काळ आत्मचिंतन व आपल्यातील ताकद ओळखण्याचा आहे. परिस्थिती आपले धैर्य टिकवून ठेवतील.
■ नोकरी-व्यवसाय : हा आठवडा तुमच्या करिअरमध्ये स्थिरतेचे संकेत देऊ शकतो. पण अपेक्षित परिणामासाठी जास्त प्रयत्न करायला हवेत. वरिष्ठांशी नम्रतेने वागावे कारण त्याचा उपयोग भविष्यात होईल. व्यापारी वर्गाने देवघेवीत विशेष दक्षता बाळगावी. पैशाचा ओघ सामान्य राहील पण खर्चावर ताबा ठेवावा.
नातीगोती या आठवड्यात कुटुंब तुमची प्राथमिकता राहील. घरात एखाद्या मंगलकार्याचे वा शुभचर्चेचे वातावरण राहील. जीवनसाथीसोबत भावनिक संबंध मजबूत होतील. प्रेमसंबंधात संवेदनशीलता जास्त राहील. त्यामुळे स्पष्टपणे बोलावे. आई-वडिलांच्या तब्बेतीकडे लक्ष द्यावे.
■ आरोग्य हा आठवडा तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने मध्यम राहणार आहे. पोट व छातीसंबंधित किरकोळ समस्या राहू शकतात. त्यामुळे खाण्या-पिण्याबाबत दक्ष राहावे. अधिक तणाव घेऊ नये व पुरेशी झोप घ्यावी. पाणी जास्त प्रमाणात प्यावे. ताजी फळे व भाज्या खाव्यात.
■ शुभदिनांक : ०१, ०४,०५
शुभरंग पिवळा, लाल,पांढरा
■ शुभवार रविवार, सोमवार, मंगळवार
■ दक्षता भावनेच्या भरात कोणताहही निर्णय घेऊ नये. आर्थिक बाबीत कोणावरही जास्त विश्वास टाकू नये.
■ उपाय : सोमवारी शिवलिंगावर पूजा व दुग्धाभिषेक करावा. ॐ नम शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यामुळे आरोग्य सुधारून मानसिक शांती मिळेल