मेष

    01-Mar-2026
Total Views |
 

Horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साह घेऊन आला आहे. मागील आठवड्यात अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यास हा काळ उत्तम आहे. तुमच्यात दुप्पट शक्ती व आत्मविश्वास आढळेल पण तुम्ही तुमच्या मर्यादा ओळखून पुढे जावे. कोणतीही योजना बनवताना स्वतःची क्षमता पाहावी.
 
■ नोकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रात स्थिती रुळावर दिसून येताना दिसेल. जर नुकतीच काही कारणांमुळे कामाचा वेग मंदावला असेल तर तो आता सुधारू शकतो. नव्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करताना तो व्यवस्थित तपासून पाहावा भागीदारीबाबत सावध राहावे. कागदपत्रे व्यवस्थित वाचावीत.
 
■ नातीगोती नात्यांसाठी हा आठवडा दिलासा देणारा असेल. जे मतभेद वा तणाव चालू होते ते मिटताना दिसत आहेत. जीवनसाथी वा प्रेमीसोबतचे संवाद उत्तम राहतील. कुटुंबात सामंजस्य राहील. त्यांचा सल्ला व अनुभव उपयुक्त ठरेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे शांती मिळेल.
:
■ आरोग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे. अचानक अशक्तपणा जाणवू शकतो. खाण्या-पिण्याबाबत जपावे. तळकट तेलकट पदार्थ टाळावेत. तणाव टाळण्यासाठी योग व प्राणायामाची मदत घ्यावी. छोटीशी बेपर्वाईही मोठा त्रास देऊ शकते त्यामुळे सावध राहावे.
 
■ शुभदिनांक : ०१, ०४,०५ शुभरंग पिवळा, लाल, पांढरा
 
■ शुभवार रविवार, सोमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात अफवा वा अधुऱ्या माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेऊ नये.
 
उपाय : रोज सकाळी शिवशंकराचे स्मरण करावे. सोमवारी किमान १२१ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. सकाळी मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावा.