आजकाल सर्वजण घरी आणि घराबाहेर माेबाइल आणि इतर गॅजेट्समध्ये गुंतलेली दिसतात. डिजिटल माध्यमांमुळे आपण आपल्या प्रिय व्यक्तीपासून दुरावले जाताे.त्यामुळे दिवसभरातील काही तास हे फक्त घरच्यांसाठी राखून ठेवा. गप्पा-टप्पा आणि सुख-दुःख घरच्यांसाेबत शेअर केल्यामुळे तुमचा मानसिक ताण नक्कीच कमी हाेऊ शकताे. सतत माेबाइलमुळे किंवा काेणत्या काेणत्या स्क्रीन समाेर राहिल्याने डाेळ्याला ताण येताे. त्यामुळे शक्य असेल तर घरी आल्यावर ऑफिसच्या कामाचा विचार करू नका. शिवाय सुट्टीच्या दिवशी कुटुंबासाेबत वेळ घालवा. प्रिय व्यक्तीसाेबत वेळ घालविल्यामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या ताणापासून दूर राहू शकाल.
मेडीटेशन अर्थात ध्यान करण्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा हाेऊ शकेल. याेगासन आणि ध्यानधारणेमुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते. यासाठी दरराेज सकाळी नियमित ध्यानाचा सराव करा. सुरुवातीला तुमचे मन ध्यान करण्यास नकार देईल. ध्यानाला बसल्यावर तुमच्या मनात अनेक विचारांचा गाेंधळ देखील उडेल. मात्र मुळीच चिंता करू नका. हळूहळू सरावाने तुमचे मन शांत आणि निवांत हाेईल. जर तुम्हाला मेंटल प्रेशरपासून दूर राहायचे असेल तर नियमित मेडीटेशन करा.प्रत्येकाला एखादा छंद असू शकताे.
काहीजणांना लेखनाची आवड असते तर काहीजणांना निरनिराळे पदार्थ तयार करण्याची. तुम्हाला काय करायला आवडतं हे ओळखा. पैसे कमाविण्याच्या धावपळीत कधीकधी आपण आपल्या आवडी-निवडी विसरून जाताे. मात्र कामावरून आल्यावर अथवा सुटीच्या दिवशी एखादा छंद जाेपासला तर त्यात तुमचे मन गुंतून राहू शकते. मन एखाद्या आवडी-निवडीत गुंतविल्यामुळे तुमच्या मनावरचा ताण आपाेआप कमी हाेऊ लागताे. नृत्य, गाणी, कलाकुसर, चित्रकला अशा अनेक छंदापैकी तुमचं मन कशात रमतं ते ओळखा. साेशल मीडियाचा उपास करा. अर्थात महिन्यातले काही दिवस अजिबात साेशल मीडिया बघायचा नाही. याचा फायदा खूप जणांना हाेताे आहे.