येथील रामदरा तलावाच्या माथ्यावर असलेल्या डाेंगरावर आई तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराजांची 108 फुटांची भव्य प्रतिमा साकारण्यात येणार आहे. आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वादरूपाने भवानी तलवार देत असल्याची प्रतिमा साकारण्यात येणार असून, ऐतिहासिक घटनेवर आधारित असलेले शिल्प भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरणार आहे.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे मंदिर व तुळजापूरच्या नियाेजित विकासासाठी तयार करण्यात आलेल्या तुळजापूरविकास आराखड्यासाठी एकूण 1865 काेटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, शहरातील वाहतूक व गर्दीचे नियाेजन, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे जतन करणे; तसेच तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक व सांस्कृतिक पर्यटन केंद्र करणे हा या आराखड्याचा उद्देश आहे. या आराखड्यात भाविक सुविधा केंद्र, वाहनतळ, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा व ऐतिहासिक मंदिरांचा जीर्णाेद्धार अशा विविध कामांचा समावेश आहे.
या विकास आराखड्याच्या अनुषंगाने रामदरा तलावाच्या माथ्यावर असलेल्या डाेंगरावर तुळजाभवानी देवी व छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अश्वारूढ प्रतिमा उभारण्यात येणार असून, 108 फूट उंच शिल्प उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तलाव परिसरात शिल्प एकरूप दृश्यरूपाने दिसेल अशी नियाेजनबद्ध आखणी करण्यात आली आहे. हे शिल्प भाविकांच्या दर्शनानुभवाला अधिक स्मरणीय करेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिर्नित मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी व्य्नत केला. या शिल्पकृतीचे अंतिम स्वरूप ठरवण्यासाठी ऐतिहासिक व पाैराणिक संदर्भांचा अभ्यास करून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयाेजिण्यात आली असून, त्यानुसार पाच शिल्पे निवडण्यात आली आहेत.तज्ज्ञ समितीद्वारे यातून अंतिम शिल्पाची निवड झाल्यानंतर त्याच्या ब्राॅन्झमध्ये उभारणीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. प्रकल्पासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून मिळालेल्या 10 एकर जागेचा वापर हाेणार आहे. हे शिल्प तुळजापूरच्या धार्मिक पर्यटनाचा प्रमुख आकर्षणबिंदू ठरेल, असा विश्वासही म्हैसकर यांनी व्य्नत केला.