पण खरं रहस्य त्या मूर्तीच्या व्यवस्थेत दडून आहे. जर महावीरांची मूर्ती लक्षपूर्वक न्याहाळली तर त्यांचं संपूर्ण शरीर एक विद्युतवलय असल्यांचं आपल्या लक्षात येईल. दाेन्ही पाय जुळलेले, दाेन्ही पायांचे चवडे गुडघ्याजवळ जुळलेले दिसतील. विद्युत-उत्सर्जनाचे जे बिंदू असतात ते नेहमी टाेकदार असतात. टाेकांतून विद्युत बाहेर पडत असते गाेल वस्तुंमधून ती कधी बाहेर पडत नसते. फ्नत टाेकदार वस्तुतून विद्युत बाहेर जाते.बाहेरची यात्रा करते. जननेंद्रियातून जास्तीत जास्त विद्युत बाहेर फेकली जाते आणि म्हणूनच आपण संभाेगानंतर इतके थकलेले, बैचेन अन उद्विग्न हाेऊन जाताे. कारण शरीराने बरीच विद्युत ऊर्जा बाहेर फेकून दिलेली असते.
संभाेगानंतर आपला र्नतदाब खूपच वाढलेला असताे, हृदयाचे ठाेके जलद पडतात, वीर्यस्खलन हेच त्याचं कारण नाहीये. वीर्यस्खलनाबराेबरच जननेंद्रिय खूपच माेठ्या प्रमाणात विद्युत ऊर्जा शरीराच्या बाहेर फेकत राहतं. त्या विद्युत-ऊर्जेचेही कप्पे आहेत. म्हणून तर पद्मासन, सिद्धासन या ज्या बसण्याच्या शैली आहेत त्यामध्ये जननेंद्रियाला विद्युत पुरवठा करणाऱ्या बिंदूंना दाब मिळताे. अन् मग या बिंदूना दाबल्याने ताे पुरवठा बंद हाेताे. दाेन्ही पाय शरीराबराेबर जुळून राहतात.आणि दाेन्ही पायातून जी ऊर्जा निघते ती शरीर परत परत आतच ठेवून घेतं. दाेन्ही हात जुळलेले असल्याने विद्युत त्यांचेतून बाहेर फेकली जात नाही. एका हातातून अशी ती यात्रा करते.