दातओठ खाण्याचं रागाशी काय देणं-घेणं आहे? आपण दात-ओठ न खाता आरामात रागवा, दात-ओठ खाल्ल्याशिवाय जमायचं नाही. कारण दातांकडे विद्युत वाहणं चालू झालेलं असतं.पण सभ्य माणूस दातांचा उपयाेग करीत नसताे. कधी कधी असभ्य माणसं रागावली की चावून घेतात, पण सभ्य माणसं तसं काही करीत नाहीत.पण तुम्ही सभ्य झालात, हे दातांना माहिती नाही? तुम्ही चावत नाही तेव्हा दातांमध्ये उत्पन्न झालेली विद्युत जी चावण्यानं माेकळी हाेते, आता माेकळी हाेऊ शकणार नाही ती दातांच्या आसपास हिरड्यांमध्ये साचत राहते, त्या ऊर्जेचे तेथे कप्पेच तयार हाेतात.माणसाचे जे दातांचे राेग आहेत त्यातले नव्वद ट्नके राेग म्हणजे दातांभाेवती बनलेले हे हिंसेचे कप्पे आहेत. म्हणून जनावरांचे दात कसे निराेगी आहेत.
कुत्र्यांचा जबडा जरा उघडून पहा. ताे कधी मंजन लावत नाही, दातच घासत नाही, काेणत्याच प्रकारची टूथपेस्ट वापरीत नाही. पण त्याच्या दातांची चमक, शुभ्रता, चकचकीतपणा पाहा! पण असं का? खाेलात उतरून पाहिलं तर असं दिसतं की याचा संबंध शरीराशी कमी अन् मनाशी जास्त आहे. हिंसेची पाॅकेट्स, कप्पे कुत्र्याच्या जबड्यात नाहीयेत. आणि कधी जर असे कप्पे कुत्र्यांच्या जबड्यात झालेच तर खेळून ते माेकळे करून टाकतात. कुत्री आपण पाहिली असतील, खेळा-खेळात ती चावतात, म्हणजे चावत नसतात; पण नुसतं ताेंड विचकतात. पुनः साेडून देतात. ती खेळून हिंसा-मु्नत हाेऊन जातात. तेव्हा जनावरांच्याइतके निराेगी स्वस्थ दात माणसालाही मिळतील, असा विचार स्वप्नातही माणूस करू शकत नाही.