एखाद्या अतिहिंसक माणसाची चिकित्सा थिओडेर रेक अगदी आगळ्या प्रकारेच करी. ताे त्याला झाेपवी अन् त्याच्या जबड्याच्या विशिष्ट ठिकाणांवर इत्नया जाेराने दाबे की ताे माणूस आरडाओरडा करी, मारपीट करू लागे.आणि नेहमीच असे हाेत असे की रेकचे राेगी रेकला झकासपैकी ठाेकून काढीत असत. पण लगेच, दुसऱ्या दिवसापासून त्यांच्यात फरक पडू लागे. त्यांच्या हिंसेत एक प्रकारचा माैलिक फरकच पडत असे.रेकचं असं म्हणणं हाेतं, अन् ते रास्त आहे की हिंसेचं जे माैलिक केंद्र आहे ते दात हेच हाेय.
सर्वच जनावरांबाबत अन् माणसाबाबतदेखील. कारण माणूस हे एक जनावरांच्या साखळीतील फ्नत पुढे आलेलं जनावर आहे एवढंच. त्यापेक्षा जास्त नाही.एकूण एक जनावरे दातांनीच हिंसा करतात. दात तरी नाहीतर नखं तरी. बस्स दाेनच असे भाग आहेत.
माणसाने हिंसेच्या अशा यु्नत्या शाेधून काढल्या आहेत की त्यामध्ये दातांचीही गरज नसते. अन् नखांचीही नसते. पण शरीराची जी यंत्रणा आहे ती तुम्ही सुरी कधी बनवलीत याचा काहीच पत्ता नाही. आपण दातांच्या ठिकाणी माणसाला मारण्यासाठी अगदी साेयीस्कर अशी हत्यारे बनवून टाकली आहेत, याचा शरीराला पत्ताही लागलेला नाही. शरीराची अंगे, र्नतपेशी इ.जुन्याच शैलीने काम करीत राहतात. जेव्हा तुम्ही हिंसेनं भरून जाता तेव्हा पहा आपल्या दातांमध्ये कम्पन सुरू हाेते. आपल्या दातांकडे खास वीज वाहायला लागते, दात-ओठ खाल्ले जातात, दात आवळले जातात. आपण म्हणता की मी मग असा रागावलाे की अगदी दातओठ खाऊ लागलाे.