जगभरातील चहाविषयीच्या सवयी

    28-Feb-2026
Total Views |
 

tea 
 
आज जगभरात जवळपास सगळीकडे चहाचे सेवन हाेते. जवळपास हजाराहून अधिक चहाचे प्रकार जगभरात नावाजले जातात. पण चहाचं मूळ ज्या देशात आहे त्या चिनी मंडळींच्या मते चहा काेणताही असाे, त्यासाठी वापरलं जाणारं पाणी महत्त्वाचं असतं.खास चहा बनवण्यासाठी चीनमध्ये विशिष्ट तलाव अथवा नदीचं पाणीच आणलं जाई. त्या पार्श्वभूमीवर विचार करता आपल्याकडे टपरीवर मिळणाऱ्या चहासाठी कुठलं पाणी वापरलंय याच्या फंदात आपण पडत नाही आणि हा विचार करू लागलाे तर चहा पिणं कठीण हाेईल.तरीही अनेक टपऱ्यांवरचा चहा हा उत्तम टीशाॅप्सना मागे टाकेल इतका ए वन असताे, भारतीयांचीच नव्हे तर जगभरातील अनेकांची सकाळ चहाच्या वाफाळत्या पेल्याशिवाय अशक्य आहे.
 
चहाशिवाय सकाळ म्हणजे धुके दाटलेले उदास उदास किंवा सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अशीच भावावस्था. या महात्म्यामुळेच पाण्याच्या खालाेखाल लाेकप्रिय ठरलेले हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पेय आहे.चहाचे फायदे अनेक, परंतु त्याचा अतिरेकही नकाे. चहाचे प्रकार तरी किती? ग्रीन टी, मिल्क टी, कप्पा, स्ट्राँग टी वगैरे.या शिवाय कमी साखरेचा, बिनसाखरेचा, काेल्ड, हाॅट असे आपल्या मर्जीप्रमाणे चहाची लजत आपणास नवी अनुभूती देते.चहातील घटकांची उपयुक्तता आपल्या शरीराला नवा तजेला देते.
चीनमध्ये चहा ला चायी असे संबाेधतात. गेली अनेक शतके चीन मधे हिरव्यापानांचा चहा पिण्यात येताे. गंध असलेली याेग्यप्रमाणातील चहाची पाने उकळ्वून पारंपारिकचहा करण्यात येताे.
 
जपानमध्येही चहापान महत्वाचे समजले जाते. चहा देण्याच्या खास पद्धतींचे तेथे प्रशिक्षणही दिले जाते.तिबेटमध्ये ब्राेकटी ची पाने चुरडून रात्र भर पाण्यात भिजवतात.आणि नंतर त्यात मीठ, बकरीचे दूध व याकच्या दूधाचे लाेणी घालून लाेणीयुक्त चहा पितात.इराण व अफगाणिस्तानात ग्रीनटी पिण्यातयेताे.अमेरिकेध्ये भरपूर साखर घालून बर्फ घातलेला चहा पिण्यात येताे. माेराेक्काे या देशात ऊंच चांदीच्या किटलीतून ग्रीन टीचे मिश्रण घेउन त्यात गरम पाणी घालतात. हे मिश्रण छाेट्या पेल्यामध्ये थाेडे उंचावरुन ओततात, जेणेकरुन त्याला साेनेरी फेस येताे. ओमान येथ ेचहामधे साखर घातलीच जात नाही.