पहिल्या साेलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला सर्वाधिक प्रवाशांची पसंती

    27-Feb-2026
Total Views |
 
 

vande 
 
''पुणे, साेलापूर रेल्वे विभागातून सुरू झालेल्या पहिल्या साेलापूर-पुणे-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमधून गेल्या तीन वर्षांत 23 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यात पुणे-मुंबई-पुणे या मार्गावर सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केल्याचे दिसून आले.वंदे भारतमुळे या तीन शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी झाला आहे.पुणे, साेलापूर विभागातून वंदे भारत सुरू करण्याची मागणी झाल्यानंतर 9 फेब्रुवारी 2023 राेजी साेलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. तीन वर्षांचा टप्पा पार करून या गाडीने प्रवाशांच्या पसंतीची जलद आणि आधुनिक सेवा म्हणून आपले स्थान भ्नकम केले आहे. या गाडीने अल्पावधीतच प्रवासीसंख्या, वेळेची बचत आणि सुविधा या तिन्ही बाबतीत उल्लेखनीय कामगिरी नाेंदवली. जानेवारी 2026 पर्यंत गाडीची सरासरी 102.27 ट्नके प्रवासी वारंवारिता नाेंदली गेली असून, जवळपास 23.43 लाख प्रवाशांनी आरामदायी प्रवास केल्याचे दिसून आले.
 
आधुनिक पुश-अँड-पुल तंत्रज्ञानामुळे बाेरघाटासारख्या अवघड घाट विभागातूनही बँकर लाेकाेशिवाय रेल्वेची सुरळीत धाव शक्य झाली आहे.या वंदे भारतला पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे असा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.पुणेकरांसाठी तर सकाळच्या वेळी आणखी एक एक्स्प्रेस रेल्वे सेवा मिळाल्याचा खूप माेठा फायदा झाला.या गाडीला पुण्यातून माेठी गर्दी असते.
मुंबईला नाेकरी, व्यवसायासाठी जाणाऱ्या आणि परत पुण्याला येणाऱ्यांसाठी ही रेल्वे लाभदायी ठरली. त्यामुळे तीन वर्षांत या मार्गावर पुणे-मुंबई-पुणे असा साडेतेरा लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.