साेशल मीडियामुळे लाेकांच्या विचित्र वागण्यात वाढ

    27-Feb-2026
Total Views |
 


social
 
 
पूर्वी लाेक ज्ञान मिळविण्यासाठी पंडितांकडे किंवा ज्ञानी महात्माकडे जायचे. तब्येत बिघडल्यास डाॅक्टरांकडे किंवा वैद्यांकडे जायचे.आता काळ बदलला आहे. लाेकांना काेणत्याही विषयातील माहिती हवी असल्यास ते गुगल करतात किंवा यू-ट्यूबचे व्हिडिओ पाहतात.पण, त्यातून खरी आणि खाेटी दाेन्ही प्रकारची माहिती मिळते. आणि लाेक त्याच्या आधारे आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेत आहेत.भविष्य पाहण्यासाठी आता तर बरेच लाेक ज्याेतिष्याकडे जाण्याऐवजी इंटरनेटवर स्वतः ची कुंडली स्वतःच पाहू लागले आहेत.शेअर-बाजारात लाखाे रुपयांची गुंतवणूक करण्यासाठीही ते इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेल्या वेबसाईट्स, चॅनेलकडून टिप्स घेत आहेत. आणि लाखाे रुपयांची कष्टाची कमाई गमावत आहेत.
 
आराेग्यविषयक सल्लाही घेतात इंटरनेटवर काेविडच्या काळात लाेक इंटरनेटवर सतत काेराेना व त्याच्यावरील उपचारांची माहिती घेत हाेते.बातम्या ऐकत हाेते. त्यामुळे अनेकांना निराशेने, भीतीने ग्रासले हाेते, असा अनुभव समाजाने घेतला आहेअनेकजण इंटरनेटवर दाखवल्या जाणाऱ्या औषधांना उत्तम समजू लागले आहेत. भ्रामक जाहिरातींना त्यांच्या ज्ञानाचा आधार समजतात.त्यामध्ये केसगळतीच्या औषधाबद्दल बाेलणारी व्यक्ती स्वतःच या समस्येने पीडित दिसत असते.तरीही लाेक त्याचे म्हणणे ऐकतात! अज्ञानी व्यक्तीकडून सल्ला घेण्याची सवय आपल्या समाजातील अनेक लाेकांना अज्ञानी व्यक्तीकडून सल्ला घेण्याची सवय दिसते.अनेक जण पानटपरीवर दातदुखीच्या औषधावर चर्चा करताना दिसतात. जणू पानवाला स्वतः व्यावसायिक डिग्री घेतलेला डाॅक्टर आहे.
 
काही लाेक आपल्या आजारावर आसपासच्या लाेकांना तज्ज्ञ डाॅक्टरांविषयी विचारतात. बहुतांश वेळी समाेरची व्यक्ती त्या आजारातून गेलेली नसते.त्यामुळे तिला निश्चित माहिती नसते.अशावेळी ती ऐकीव माहितीवर किंवा तिच्या नात्यागाेत्यातील डाॅ्नटरांचे नाव सांगते. डिजिटल आणि सायबर जगाच्या वेगवान विकासाने याच सवयीला एक नवे स्वरूप बहाल केले आहे. अनेक लाेक आता इंटरनेट द्वारा उपचार शाेधताना दिसतात.डिजिटल व्यसन वाढले मुलामध्ये ऊकऊ चा आकडा भयानकपणे वाढताे आहे. त्यांच्यामध्ये स्थूलता आणि डिजिटल व्यसन वाढत चालले आहे. हे व्यसन साेडविण्यासाठी मानसाेपचार तज्ज्ञांचीही मदत घ्यावी लागते. माेबाइलचे व्यसन लागलेल्या मुलांकडून माेबाइल काढून घेतल्यास, त्यांनी रागाच्या भरात आत्महत्या किंवा आत्महत्येचे प्रयत्न केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
 
इंटरनेटच्या अतिरेकामुळे विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम हाेत आहे. गृहिणी घरकाम आणि मुलाच्या पालनपाेषणावर लक्ष देण्याऐवजी साेशल मीडियामध्ये डाेकं खुपसून बसलेल्या दिसतात.स्क्रीन टाईम ठेवा कमी तज्ज्ञांच्या मते, चांगल्या आराेग्यासाठी स्क्रीन टाईम दरराेज 2 तासांपेक्षा कमी ठेवला पाहिजे. परंतुभारतीयांनी ही मर्यादा बऱ्याच आधी ओलांडली आहे. पण, स्वतःची सवय बदलून फायदा हाेणार असेल तर त्यादृष्टीने पाऊले उचलणे गरजेचे आहे.स्क्रीनपासून दूर जाण्यासाठी पेड जेल दक्षिण काेरियामध्ये ‘पेड जेल’ तयार केले आहे. इथे लाेक स्वच्छेने पैसे भरून, त्यांचा माेबाइल फाेन, लॅपटाॅप, टॅबलेट आणि इतर गॅझेट्स जमा करतात. स्क्रीन टाइम शून्य ठेवून, याेगा करून व साधा आहार घेऊन जीवनशैलीमध्ये सुधारणा करतात. भारतासाठीही अशा जेलची गरज पडणार आहे.