अनेक याेनींमध्ये िफरता िफरता ईश्वरकृपेनेच दुर्लभ असा मनुष्यजन्म प्राप्त हाेताे. मनुष्यजन्मातील प्राप्त हाेणाऱ्या देहामुळेच वाचन, मनन, चिंतन, पराेपकार, लाेकसंग्रह आणि मुख्य म्हणजे परमार्थ साधना करता येते. अन्य काेणत्याही याेनीमध्ये हे शक्य हाेत नसल्याने मनुष्यदेहाची थाेरवी माेठी आहे हे सांगणारा ‘‘देहदुल्लभनिरूपण’ हा समास आहे.त्याचा प्रारंभ करताना श्रीसमर्थ म्हणतात, की मानवदेहामुळेच गणपती, शारदा, गुरू आणि संतसज्जन यांना वंदन करता येते. देहामुळेच कवित्व, अध्ययन, विद्याभ्यास, श्रवण, मनन, भक्ती, दानधर्म, व्रतवैकल्ये, पुरश्चरणे, अनुष्ठाने, तपसाधना आणि याेगसाधना करता येते. मानवी देह व त्यातील बुद्धी यांच्या आधारानेच कर्ममार्ग, उपासनामार्ग, ज्ञानमार्ग व भक्तीमार्ग धरता येताे.मनुष्यदेह आहे म्हणूनच ज्ञानी, महाज्ञानी, साधूसिद्ध, ऋषी, मुनी, तपस्वी, याेगी, विरागी आणि वीतरागीसुद्धा हाेऊ शकताे.
देहामुळेच मनुष्य पुण्यवान, मेधावान व त्यागी बनू शकताे. देही असल्यामुळेच ताे कीर्ती, समृद्धी, यश व नावलाैकिक प्राप्त करू शकताे. गायनकला, वादनकला आणि अंतरंगातील नाना कळा देहामुळेच साध्य करता येतात. प्रेम, माया, ममता, जिव्हाळा, आदरभाव या सर्व उदात्त भावना देह आहे म्हणूनच प्राप्त हाेतात आणि व्यक्तही करता येतात.अर्थात या सर्व चांगल्या व उत्तम गाेष्टी जशा देहाच्या आणि मनुष्यजन्माच्या सदुपयाेगामुळे घडतात तशाच अनेक वाईट गाेष्टीसुद्धा देहाच्या दुरुपयाेगामुळे घडू शकतात. पापवासना, कामवासना, माेह, लाेभ, मत्सर हे दुर्गुणही देहामुळेच घुसू शकतात. आपला प्रपंच आता बुडतच चालला आणि मग परमार्थ तर हाेणारच नाही अशी त्याला टाेचणी लागते. ताे त्यामुळे अस्वस्थ हाेताे आणि स्वत:ला सुधारण्याची त्याला तळमळ लागते.
त्या दुर्गुणांमुळे अपकीर्ती, दुर्लाैकिक, पापाचरण घडत जाऊ शकते. देह हा अग्नीप्रमाणे आहे. त्याचा उपयाेग जसा तुम्ही कराल तसा ताे साथ देत असता