नवी मुंबईकर थकबाकीदारांच्या संख्येत वाढ : आयु्नतांची माहिती

    27-Feb-2026
Total Views |
 

NM 
राज्यातील श्रीमंत महापालिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर थकबाकीदारांची संख्या वाढू लागली आहे. शहरात एकूण तीन लाख 58 हजार मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी एक लाख 72 हजार म्हणजे निम्म्याहून अधिकमालमत्ताधारकांनी पालिकेचा मालमत्ता कर भरला नसल्याची माहिती आयुक्त डाॅ.कैलास शिंदे यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिली. पालिका प्रशासनाने यंदा एक हजार काेटींचे मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले असून, उद्दिष्टपूर्तीसाठी कठाेर भूमिका घेतली जाईल. उद्दिष्टपूर्ती न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला.नवी मुंबई महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांनी ही माहिती दिली.
 
या परिस्थितीचा थेट परिणाम पालिकेच्या महसुलावर आणि परिणामी नागरी सुविधा व विकास कामांवर हाेत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात एकूण 3 लाख 58 हजार मालमत्ताधारक असून, त्यांपैकी 1 लाख 72 हजार मालमत्ताधारकांनी वर्षानुवर्षे मालमत्ता कर भरलेला नाही. सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या कर दर निश्चितीच्या ठरावावर चर्चा करताना त्यांनी ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. इतक्या माेठ्या प्रमाणावर थकबाकी राहणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.वारंवार नाेटिसा देऊनही कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर इच्छा नसतानाही कारवाई करावी लागते. त्यामुळेच निवडून आलेल्या लाेकप्रतिनिधींनी महापालिकेला कर वसुलीत सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. महसुलात वाढ झाल्यास वाढीव विकास निधीच्या माध्यमातून नगरसेवकांनाच याचा फायदा मिळेल, असे आयुक्तांनी सांगितले.