माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात काेल्हापूर समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांची विशेष मुलाखत प्रसारित हाेणार आहे. या मुलाखतीतून समाजकल्याण विभागाच्या विविध याेजना, कार्यपद्धती आणि लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, दिव्यांग आणि तृतीयपंथी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध याेजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती याेजना, शासकीय वसतिगृह सुविधा, निर्वाह भत्ता आणि थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) प्रणालीसह दिव्यांग व्यक्तींसाठी शैक्षणिक सहाय्य, आर्थिक मदत, स्वावलंबनाच्या याेजना, तसेच तृतीयपंथी घटकांच्या सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत.
या याेजनांचा लाभ कसा घ्यावा, अर्ज प्रक्रिया काय आहे आणि पात्रता निकष काेणते आहेत, याबाबत साळे यांनी मार्गदर्शन केले आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवारी (27), शनिवारी (28 फेब्रुवारी) आणि साेमवारी (2 मार्च) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित हाेईल. तसेच, ही मुलाखत छशुी जप अखठ या माेबाइल अॅपवरही ऐकता येणार आहे. ही मुलाखत सहायक संचालक वृषाली पाटील यांनी घेतली आहे.