हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर काही ठिकाणी सदाेष काम झाले आहे. वाहनांना अचानक हादरा, झटका बसत असल्याचे दिसून येत आहे. संदाेष काम मूळ ठेकेदारांकडूनच दुरुस्त करून घेण्यात येत आहे. सदाेष काम केल्याबद्दल ठेकेदारांकडून दंड वसूल केला जाणार आहे.चाैकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बाेर्डीकर यांनी दिली. तसेच, या महमार्गावर महिनाभारत फूड काेर्ट सुरू हाेतील, अशी माहितीही त्यांनी दिली.विधान परिषदेत सत्यजित तांबे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला हाेता. समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या वकासाला गती मिळाली आहे. मार्गावर काही ठिकाणी सदाेष काम झाल्याचे समाेर आले आहे. सदाेष कामे मूळ ठेकेदारांकडून दुरुस्त करून घेतली जात आहेत.
ठेकेदारांकडून दंड वसूल केला जाणार आहे. चाैकशीअंती ठेकेदारांनी कामात कुचराई केल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असेही बाेर्डीकर यांनी सांगितले.समृद्धी महामार्गावर तेरा फूड काेर्ट प्रस्तावित हाेते. त्यापैकी एकही सुरू झालेला नाही. आता समृद्धी महामार्गावर उभे राहून फळविक्री सुरू आहे. रस्त्याच्या कडेला स्टाॅल लावले आहेत, त्यामुळे अपघाताचा धाेका वाढल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर, काही कारणांमुळे रखडलेले फूड काेर्ट महिनाभरात सुरू हाेतील. फूड काेर्टमध्ये स्वच्छतागृहाची चांगली साेय उपलब्ध असेल, अशी माहिती बाेर्डीकर यांनी दिली.पीएम गती शक्ती याेजनेतून राज्यातील सर्व शहरांलगत रिंग राेड तयार केले जाणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या शेजारील शहरे या महामार्गाला जाेडण्यासाठी या रिंग राेडचा उपयाेग हाेईल. त्यामुळे ‘समृद्धी’च्या शेजारील सर्व शहरे या महामार्गाशी जाेडली जातील, अशी माहितीही बाेर्डीकर यांनी दिली.