गावरान तूप भारतीय जेवणाचा मुख्य भाग आहे. हे डायजेस्टिव्ह टॅ्र्नट सुदृढ तर राखतेच शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑ्निसडेंट्स आणि हेल्दी फॅटही असतात. जे आपल्या सांध्यांनाही याेग्य राखतात.या तुपात शाॅर्ट चेन फॅटी अॅसिड असते.ज्यामुळे हे पचायला साेपे असते. हे आपल्या हार्माेन्ससाठीही फायदेशीर असते. याच्या तुलनेत लाेण्यात लाँग चेन फॅटी अॅसिड जास्त असते, जे आराेग्यासाठी घातक असते.गावरान तुपात फक्त कॅलरीजच नसतात, तर व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियम, फाॅस्फाेरस, मिनरल्स, पाेटॅशियम यासारखे अनेक पाैष्टिक घटकही असतात. याच कारणांमुळे तूप खाल्ल्यामुळे सांधे मजबूत हाेतात व उतारवयातही सांधेदुखी सतावीत नसते.गावरान तुपाबाबत एक गैरसमज असाही आहे की, हे काेलेस्ट्राॅल वाढवते. खरे तर हे तेवढेच काेलेस्ट्राॅल शरीरात पाेहाेचवते जेवढे शरीरासाठी आवश्यक आहे.
याचे फायदे समजून घेण्यासाठी लायपाे प्राेटीन समजून घेणे आवश्यक आहे.लायपाे प्राेटीन दाेन प्रकारचे असतात. हाय डेंसिटी लायपाे प्राेटीन व लाे डेंसिटी लायपाे प्राेटीन.हाय डेंसिटी लायपाे प्राेटीन हानिकारक नसते तर लाे डेंसिटी लायपाे प्राेटीन धमण्यांमध्ये चिकटते, जे जास्त घातक असते. तुपात हाय डेंसिटी लायपाे प्राेटीन असते, ज्यामुळे शरीराचे जास्त नुकसान हाेत नाही.आपण, गावरान तूप आपल्या तळहातावर ठेवून देखील त्यात भेसळ आहे की नाही ते ओळखू शकता. यासाठी अर्धा चमचा तूप आपल्या तळहातावर घ्या, तळहातावर घेतल्याबराेबर तूप जर वितळायला सुरुवात झाली तर असे तूप शुद्ध असते.मात्र जर तूप वितळायला उशीर झाला तर तुपात भेसळ असू शकते, ही चाचणी केवळ उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात केली जाऊ शकते. हिवाळ्यात ही चाचणी करून देखील याेग्य ताे निष्कर्ष मिळणार नाही.