मित्रांची साेबत असणे अत्यंत गरजेच

    27-Feb-2026
Total Views |
 

friends 
आनंदाचा स्राेत
 
आपण सुदृढ राहण्यासाठी काय करीत नसताे? ताज्या भाज्या व फळांचे सेवन, नियमित ए्नसरसाइज व पूर्ण झाेप अशा साऱ्या गाेष्टींची काळजी घेताे. पण त्तम आराेग्यासाठी एक प्रभावी उपाय आपण दुर्लक्षित असताे. ज्याप्रमाणे एखाद्याला मदत केल्यास आपल्याला चांगले वाटते तसेच जेव्हा आपण मित्रांच्या उपयाेगी पडताे तेव्हा आपल्या मेंदूत ऑ्नसीटाेसिन आणि एंडाेर्फिनसारखे चांगली जाणीव देणारे हार्माेन स्रवतात.यामुळे सकारात्मक भावना उत्पन्न हाेते.
 
आयुष्यही वाढते
 
भक्कम साेशल नाते दीर्घायुष्याशी जाेडलेले असते. याचे संकेत अमेरिकेच्या काॅर्नेल विद्यापीठाद्वारे केलेल्या अध्ययनातून दिसून आले आहेत. त्यानुसार जीवनात लाे जे मजबूत ाते बनवतात, आई-वडिलांपासून जवळच्या मित्रांपर्यंत ते शरीराची वय वाढवण्याची प्रक्रिया मंदावू शकतात. अध्ययनकर्ते सांगतात की, हे साेशल फायदे बायाेलाॅजिकल एजिंग मार्कर (एपिजेनेटिक ्नलाॅक)वर परिणाम करू शकतात. जे मिथाइलेशनमध्ये हाेणाऱ्या बदलांना ट्रॅक करतात.
 
मानसिक व शारीरिक आराेग्य
 
आज जेव्हा आभासी जगाच्या संवादाने प्रत्यक्ष समाेरासमाेरच्या संभाषणाची जागा घेतली आहे. एकाकीपणाने बहुसंख्य लाेकांना आपल्या कचाट्यात घेतले आहे. यामुळे हृदयराेग व स्ट्राेकचे धाेके वाढत आहेत. अशावेळी विज्ञानाने साेशल कने्नशन, फिजिकल व मेंटल हेल्थमधील संबंधावर रंजक प्रकाश टाकला आहे. निरनिराळी अध्ययने या गाेष्टीची पुष्टी करीत आहेत की, ज्या लाेकांचे मजबूत सामाजिक संबंध असतात त्यांच्यात हृदयविकार, मधुमेह व ब्लडप्रेशरसारखे आजार वाढण्याची श्नयता कमी असते. काेलेस्ट्राॅलची पातळी नियंत्रित राहते. अर्थात मैत्री गुंतवणूक करणे संपूर्ण आराेग्यासाठी फायदेशीर हाेऊ शकते.
 
खरी मैत्री
 
खरी मैत्री फक्त साेबत हसण्यासाठी वा साेयीपुरती मर्यादित नसते. यात एकमेकांना जज केले जात नाही. काेणत्याही नियंत्रण व अटीविना साेबत मिळते व जजमेंटशिवाय खरे बाेलण्याचा विश्वास असताे. याचा फायदा तेव्हा हाेताे जेव्हा एक खरा मित्र असताे. कारण ताेच आपल्याला ती स्पेस देताे तिथे आपल्याला दिखावूपणा करावा लागत नाही. आपण कितीही कमकुवत, अनिश्चित व अधुरे असलाे तरी ताे आपल्याला स्वीकारताे.मित्र आपल्या यशाचा उत्सव साजरा करताे व तेवढाच धैर्याने आपले दाेषही दाखवताे. एवढेच नव्हे तर अपयश, दु:ख व बदलाच्या काळात खरे मित्र आपल्याला सारे काही ‘ठीक’ करण्याची घाई न करता आपल्यासाेबत राहतात. त्यांच्या उपस्थितीनेच समाधान मिळते.
 
भावनिक भक्कमपणा
 
जीवनात मित्र येत-जात राहतात हे सत्य आपण नाकारू शकत नाही. जर आपल्याला काळाच्या कसाेटीवर खरी ठरणारी मैत्री हवी असेल तर आपणही प्रयत्न करायला हवेत. गरजेच्या वेळी मित्रांना साथ द्यायला हवी. स्वत:ची चूक स्वीकारायला हवी. तसेच मैत्री टिकवून ठेवण्यासाठी सहानुभूती व नम्रतेचीही गरज असते. हे गुण काेणत्याही नात्यासाठी अत्यंत फायदेशीर असते आणि आराेग्यासाठीही उत्तम असतात. मैत्री जीवनाचा एक सुंदर भाग आहे. ताे आपल्याला आनंद, आधार, साेबत व समज देताे. असे म्हणतात की आपण आपले कुटुंब निवडू शकत नाही पण उत्तम मित्र अवश्य बनवू शकताे.