बीज साेहळ्यानिमित्त देहूतील इंद्रायणीच्या पाणी वापरावर प्रशासनाकडून बंदी जाहीर

    27-Feb-2026
Total Views |
 

dehu 
 
 
श्रीक्षेत्र देहूत 3 ते 5 मार्च या कालावधीत हाेणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज साेहळ्यानिमित्त इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यासह स्वयंपाकासाठी वापरण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.साेहळा कालावधीत राज्यासह इतर राज्यांतून माेठ्या संख्येने भाविक व वारकरी श्रीक्षेत्र देहूत येतात. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार देहूत इंद्रायणीच्या दाेन्ही तीरांवरील पाणी पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. नदीचे पाणी पिण्यास वापरू नये. भाविकांनी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळांचा वापर करावा.
 
नदीपात्रात कपडे धुणे किंवा पाणी दूषित हाेईल, असे काेणतेही कृत्य करू नये. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. बीज साेहळा कालावधीत देहू नगरपंचायत हद्दीतील रस्त्यांवर व सार्वजनिक जागेत संसर्गजन्य रुग्णांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, संबंधित क्षेत्रात काेणताही संसर्गजन्य रुग्ण आढळल्यास देहू नगरपंचायतीने तयार केलेल्या शेडमध्ये त्यांना राहणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.