मेडिकल बिल रकमेचे वाटप यापुढे ‘महाकर्मी’द्वारे हाेणार

    27-Feb-2026
Total Views |
 

bill 
 
आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘महाकर्मी मेडिकल बिल क्लेम वेब पाेर्टल’, तसेच राज्यातील वैद्यकीय मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक सक्षम करणाऱ्या ‘वैद्यकीय अधिकारी मॅनेजमेंट सिस्टीम (व्हीएएमएस)’ या डिजिटल पाेर्टलचा प्रारंभ करण्यात आला. आराेग्य प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.सार्वजनिक आराेग्य विभागाचे मुख्य सचिव डाॅ. निपुण विनायक, आराेग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आराेग्य अभियान संचालक डाॅ. कादंबरी बलकवडे, आराेग्य सेवा संचालक डाॅ. नितीन अंबाडेकर, संचालक डाॅ. विजय कंदेवाड, आराेग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी, तसेच सर्व जिल्हा आराेग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आराेग्य सेवा उपसंचालक दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित हाेते.
 
गेल्या अधिवेशनात यासंदर्भात दिलेले आश्वासन आराेग्य विभागाने पूर्ण केले आहे.या उपक्रमामुळे प्रतिपूर्ती प्रक्रियेत सुसूत्रता येईल. कर्मचाऱ्यांची सर्व बिले यापुढे ऑनलाईन पद्धतीनेच निघाली पाहिजेत.वैद्यकीय देयकांना विलंब हाेणार नाही याची जिल्हा शल्यचिकित्सकांनी दक्षता घ्यावी, असे आबिटकर यांनी सांगितले. या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी www.mahakarmi.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.राज्यातील वैद्यकीय मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी ‘वैद्यकीय अधिकारी मॅनेजमेंट सिस्टीम’ (व्हीएएमएस) हे पाेर्टल सुरू करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे पदनिहाय माहिती, तज्ज्ञ व विशेषज्ञ डाॅक्टरांची उपलब्धता, संस्थात्मक माहिती, सेवा तपशील, तसेच अनुपस्थिती नियंत्रणाची अचूक नाेंद ठेवता येणार आहे. अधिक माहितीसाठी
www.vams.org.inया संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आबिटकर यांनी सांगितले.