एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतन वाढीचा थकीत हप्ता बँक खात्यात जमा झाला

    27-Feb-2026
Total Views |
 
 

bank 
सुमारे 86 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणे कठीण झाले असताना शासनाने तातडीने 100 काेटींची तरतूद केली.परिणामी फेब्रुवारीच्या थकीत वेतनवाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला. हा केवळ आर्थिक दिलासा नसून, ताे शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा प्रत्यय आहे, असे सरनाईक यांनी सांगितले. सरनाईक यांनी मुख्यमंत्री व दाेन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत यासाठी 210 काेटींची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, त्यांपैकी 100 काेटींचा निधी तत्काळ उपलब्ध झाला आहे. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त हाेणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.