सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अॅपला ‘डिजिटल इनाेव्हेशन’ पुरस्कार
27-Feb-2026
Total Views |
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने विकसित केलेल्या वृक्षाराेपण व देखरेख अॅपला (ट्री प्लॅन्टेशन अँड माॅनिटिरिंग अॅप) बिल्ड इंडिया इन्फ्रा अवाॅर्ड अंतर्गत रस्ते व महामार्ग गटात ‘डिजिटल इनाेव्हेशन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते यांनी विभागाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांची भेट घेऊन या यशाबद्दल सविस्तर माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने विकसित केलेल्या या डिजिटल उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेला सन्मान राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे शिवेंद्रलिंहराजे भाेसले यांनी सांगितले