जर वर दिलेल्या लक्षणांवरून हे स्पष्ट झाले की आपल्याला कसे जाणवत आहे तेव्हा आपण आपल्या डाॅ्नटरांना आपल्याला अॅनिमिया झाल्याचे सांगू शकता. डाॅ्नटर तपासून सांगतील की अॅनिमिया आहे की इतर काेणता आजार.जर अॅनिमिया असेल तर याच्या याेग्य उपचारामुळे दुहेरी फायदा हाेऊ शकताे. एकतर आपण उत्तम आराेग्य व शक्ती पुन्हा मिळवू शकता व आयर्नची कमतरा कळल्यामुळे आपण वेळीच स्वत:ला बरे करू शकता.
हृदयराेग : तशा बऱ्याचशा हृदयसमस्या डाॅ्नटर सहजतेने ओळखतात. काही व्यक्तींमध्ये फ्नत अनियमितता असते व जेव्हा डाॅ्नटर तपासतील तेव्हा त्यांना काही हाेत असेलच असे नाही. जर आपल्याला हार्टबीटची समस्या जाणवत असेल पण आपल्या डाॅ्नटरांना असे काही वाटत नसेल तर आपण कार्डियाेलाॅजिस्टचा सल्ला घेऊ शकता.
हायपाेथायराॅइड : आपल्या शरीरात थायराॅइड मुख्य ऊर्जा नियंत्रकआहे. आपले टिश्यू किती वेगाने किलाेजूल जाळावेत हे त्याचे नियमन करते. जेव्हा हे काम करणे बंद करते तेव्हा काेणत्याही व्यक्तीच्या शरीरात या समस्या असू शकतात. याचे सर्वांत माेठे लक्षण आहे शिथिलता, त्वचा सुखणे व लवकर थंड वाटणे. या आजाराची काही लक्षणेही आहेत, उदा. पाठ दुखणे, बद्धकाेष्ठता, स्नायूत मुरडा, व सहजतेने जखम हाेणे. व्यक्तींमध्ये कमी शक्ती असणे, सांधे कडे हाेणे, शरीराचे वजन वाढणे हा आजार वाढवते. यामुळभावुकता व तणाव निर्माण हाेऊ शकताे.एकाग्रचित्तता कमी वाटते व जीवन नीरस वाटू लागते. विशेषज्ञ टेस्ट व परीक्षणाने राेग ओळखतातत व याेग्य निदानाने रुग्णास आराम मिळताे.
सेंसिटीव्हिटी : खाण्या-पिण्याचे काही पदार्थ, औषधे, धूळ, धूर इ.विषरूी काहीजण अधिक संवेदनशील असतात.या गाेष्टींमुळे काही व्यक्तींना मायग्रेन वा सांधेदुखी हाेते तर इतर व्यक्तींना महमळू लागते. त्वचेवर लाल चट्टे पडतात.च्नकर येऊ लागते, चिंता वाटते, धूसर दिसते, श्वास घ्यायला त्रास हाेताे इ.काहींना काेणत्या वस्तूंनी त्यांच्यावर काेणती प्रतिक्रिया हाेते हे माहीत असते पण काही संवेदनशीलता अशा असतात ज्या चिरकालिक लक्षण असल्यामुळे कमी कळतात. ही केस अशीही असू शकते जेव्हा प्रतिक्रिया देणारी वस्तू रुग्ण राेज खात-पित, हुंगत वा वापरत असेल. तेव्हा ती वस्तू शाेधणे कठिण असू शकते. अशावेळी राेज वापरातील एकेक वस्तू वेगळी करण्याचा ताेपर्यंत प्रयत्न करावा जाेपर्यत प्रतिक्रिया देणारी वस्तू कळत नाही. आपल्या काल्पनिक आजाराशी स्वत: लढावे.