पंतप्रधान आवास याेजनेला (ग्रामीण टप्पा-2) मंजुरी देतानाच राज्य सरकारने या घरकूल याेजनेच्या अनुदानातही 50 हजारांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव अनुदानातील 35 हजार रुपये घरकुलाच्या बांधकामासाठी व 15 हजार रुपये पंतप्रधान सूर्यघर याेजनेंतर्गत साैर ऊर्जा यंत्रणेसाठी दिले जाणार आहेत. याशिवाय केंद्रातर्फे साैर ऊर्जेसाठी आणखी 30 हजार रुपये उपलब्ध हाेणार आहेत. त्यामुळे घरकुल याेजनेत साैर ऊर्जा याेजनेसाठी सरकारकडून एकूण 45 हजार, तर लाभार्थ्यांना 5 हजारांचा स्वहिस्सा भरावा लागेल. मात्र, यातून सरकारी घरकुलांना साैर ऊर्जेचा लाभ मिळणार आहे. माहिती देण्यात आली. यापूर्वी राज्यात पंतप्रधान आवासचा ग्रामीण टप्पा-1 याेजना 2016-17 ते 2021-22 या कालावधीत राबवला हाेता. त्यावेळी याेजनेत सपाट भागांसाठी प्रतिघरकूल 1 लाख 20 हजार, तर डाेंगराळ-दुर्गम भागांसाठी 1 लाख 30 हजार इतके अनुदान लाभार्थ्याला देण्यात आले हाेते.
आता राज्य सरकारने ग्रामीण टप्पा-2 2024-25 ते 2028-29 राबवताना लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ केली आहे. राज्याच्या हिश्श्यातून अतिर्नित अनुदान 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वतःचे घरउभारण्यासाठी त्याची माेठी मदत हाेणार आहे.पंतप्रधान आवास याेजना-ग्रामीण, रमाई, शबरी, यशवंतराव चव्हाण व माेदी आवास याेजना आदी याेजनांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासन ग्रामीण भागात बेघरांना घरकुलास अनुदान देते.अहिल्यानगर जिल्ह्यात पंतप्रधान आवास याेजना ग्रामीण टप्पा-2 मध्ये 1 लाख 25 हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली.यातील 1 लाख घरांची कामे सुरू असून, सुमारे 28 ते 30 हजार घरकुलांची उभारणी झाली आहे. टप्पा दाेनमधील मंजुरी दिलेली सर्व घरकुले साैर याेजनेसाठी पात्र ठरली आहेत.घरकुलाचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा हाेईल. त्यामुळे साैर ऊर्जा प्रकल्पाचे काम करणाऱ्या खासगी संस्थांना साैर प्रकल्पाचे काम पूर्ण केल्यानंतरच पैसे मिळणार आहेत.