रात्री उदास हाेता. सकाळी आनंदानं ओसंडून जात हाेता. रात्री काही घडलं आहे, ए्नस्प्लाेजन झालं आहे. खाेटं तर सांगत नाहीये. ताे स्वत: साक्षी आहे.त्याचं जीवन आहे.त्याची चमक, त्याचा सुगंध साक्षीला आहे. मग अनेक लाेकांनी हेमंत ऋतूत पानाखाली रात्री जागवल्या, खूप ध्यान केलं पण काहीएकझालं नाही.फ्नत सुकी पानं पडत राहिली. अन् सकाळी ते आणखीनच उदास हाेऊन घरी परतले. रात्री झाेप तर झाली नाहीच.पण लाेकांची आपल्या यात्रांची, ठिकाणं वेगवेगळी असतात.
कृष्ण जे सांगत आहे ते अर्जुनासाठी सांगत आहे.आसन उपयाेगी हाेईल. ठिकाण, वेळ उपयाेगी पडतील.जर दुपारी ध्यानासाठी बसलं तर फार अवघड हाेऊन जाईल. खरं म्हणजे तसं काही कारण नाहीये. करण दुपार काही ध्यानाची शत्रू नाहीये. पण तरीही खूप माेठी अडचण हाेईल. सूर्य जेव्हा पूर्ण तापलेला असताे, आणि डाे्नयावर येताे तेव्हा डाेकं शांत करणं फार अवघड आहे. सकाळी सूर्य जाे उगवताेय, सकाळचं ऊन काेवळं आहे अजून त्यात तप्तपणा आलेला नाही आणि त्याचे किरण तुमच्यावर उभे, सरळ पडत नसून आडवे पडताहेत, त शरीराच्या आरपार जाताहेत, डाे्नयावर येताे तेव्हा सूर्यकिरण तुमच्या शीर्षापासून, ज्याला याेगी सहस्त्रार म्हणतात, तेथून प्रवेश करतात आणि थेट तुमच्या काम-केंद्रापर्यत आघात करतात.तेव्हा सगळा प्रवाह डाे्नयापासून आपल्या कामकेंद्राकडे असा वाहताे.