ओशाे - गीता-दर्शन

    10-Feb-2026
Total Views |
 

Osho 
कारण व्य्नती वेगवेगळ्या प्रकारच्या अन् वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या असतात.समत्वबुद्धीचा परिणाम तर एकच असेल, मात्र प्रवास वेगवेगळ्या रस्त्यांवरून हाेईल.हे श्नय आहे की काेणी एखादा सुखदु:खांबाबत तितकासा संवेदनशील नसेलही. आपल्या सर्वांच्या संवेदनशीलता, सेंसिटीव्हिटीज् वेगवेगळ्या आहेत. एखाद्या व्य्नतीला सुखदु:खाचा रस्ता महत्त्वाचा न वाटता यश-अपयशांचा रस्ता जास्त महत्त्वपूर्ण वाटणे श्नय आहे. आपण म्हणाल, ‘यश म्हणजेच तर सुख आहे आणि अपयश म्हणजे दु:ख आहे.’ पण थाेड्या बारकाईने पाहिल्यास फरक लक्षात येईल.सगळं शरीर अशा प्रकारे विद्युत-वलयमय विद्युतचक्र झालेलं राहतं.
 
महावीर या बुद्धांची प्रतिमा पाहिली तर पूर्ण शरीर विद्युतचक्र झालं आहे, हे लक्षात येईल. हे जे विद्युतचक्र निर्माण हाेतं ते आपली इंद्रिये आणि आपण यामध्ये एक संरक्षक म्हणून काम करतं. एक भिंत बनून जाते त्याची.इंद्रियं वेगळी राहतात, अन् आपण वेगळे पडता. लक्षात घ्या, या विद्युत ऊर्जेचा उगम आपल्या शरीराच्या आतच आहे. इंद्रिये तिचा फ्नत उपयाेग करीत असतात. असं विद्युत ऊर्जेचं वर्तुळ बनणं ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे.असं चक्र बनून इंद्रिये बाहेर राहून जातात, आपण आत राहता. आपण अन् इंद्रिये यांच्यामध्ये विद्युत ऊर्जेची एक जणू भिंत उभी राहते, ती ओलांडता येत नसते. या घडीला आंतरआकाशाची यात्रा करणं साेपं हाेऊन जातं.