मुंबई, 4 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
राज्यातील कृषी व अन्नप्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया उद्याेगांना चालना देतानाच शेतकऱ्यांसाठी मूल्यवर्धनाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे 2100 काेटींची गुंतवणूक करून अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. या प्रकल्पामुळे 550 जणांना थेट राेजगाराच्या संधी उपलब्ध हाेण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वरुण बेव्हरेजेस आणि महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळादरम्यान (एमआयडीसी) या प्रकल्पासंदर्भातील सामंजस्य करार करण्यात आला. फळांचे ज्यूस, अन्नप्रक्रिया तसेच कृषिमालावर आधारित उद्याेगांच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या या गुंतवणुकीमुळे स्थानिक शेतकरी, कृषिपूरक व्यवसाय आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. आर्वीतील एमआयडीसीत उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात दैनंदिन वापरातील ग्राहकाेपयाेगी वस्तू (एफएमसीजी) आणि पेयपदार्थांच्या निर्मितीसाठी अत्याधुनिक उत्पादन युनिट उभारण्यात येणार आहे.