मुंबई, 4 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
‘देशातील भाषा, रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी भारतीयत्वाची ओळख सर्वांना एकत्र बांधते. देशाची विविधता ही सर्वांत माेठी ताकद असून, नागरिकांनी देशातील विविध भागांना भेटी देऊन तेथील संस्कृती अनुभवावी आणि नागरिकांशी संवाद साधावा. अशा सांस्कृतिक देवाणघेवाणीतून राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट हाेईल,’ असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
एक भारत-श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत लाेकभवनात आयाेजित आंध्र प्रदेश, छत्तीसगढ़, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब आणि तमिळनाडू या आठ राज्यांसह अंदमान व निकाेबार, चंडीगड, दिल्ली, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिन साेहळ्यात राज्यपाल बाेलत हाेते. राज्यपालांनी या राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशांतील नागरिकांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वर्मा फाउंडेशनचे संस्थापक पी. यू. एन. वर्मा, राज्य काैशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. अपूर्वा पालकर, उद्याेगपती व अभियांत्रिकी तज्ज्ञ नवीन हेगडे, निखत खान हेगडे, यशपाल शर्मा, अभिनेत्री रूपाली गांगुली, कुस्तीपटू संग्राम सिंह, अभिनेते पंकज बेरी, कॅप्टन गाेपीचंद थाेटाकुरा, राज्यपालांचे सचिव डाॅ. प्रशांत नारनवरे यांच्यासह विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते. वर्मा फाउंडेशनने या कार्यक्रमाचे आयाेजन केले. दिव्यम शरण गुप्ता यांनी कालभैरव अष्टक, तमिळनाडूच्या पथकाने भरतनाट्यम, आंध्रच्या पथकाने भथुकम्मा लाेकनृत्य, छत्तीसगडच्या पथकाने लाेकनृत्य, केरळच्या पथकाने काईकाेट्टिकली, पंजाबच्या पथकाने भांगडा, कर्नाटकच्या पथकाने तुला पद्य, दिल्लीच्या पथकाने कथ्थकचे सादरीकरण केले. मध्य प्रदेश, हरियाणा, लक्षद्वीपच्या पथकांनी लाेकनृत्य सादर केले. अंदमान आणि निकाेबार तसेच पुद्दुचेरीची ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.