मुंबई, 4 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत याेगदान देण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सुरू केलेल्या उपक्रमाला कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमांतर्गत लावणी कलाकारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाखाचा निधी दिला असून, या रकमेचा धनादेश शेलार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डाॅ. किरण कुलकर्णी आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जाेगळेकर यांनी हा धनादेश शेलार यांच्याकडे सुपूर्द केला. कलाकारांच्या कलागुणांना सामाजिक कार्याची जाेड देत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी याेगदान देण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध झाली आहे. लावणी, संगीत, नृत्य, नाटक आणि हिंदी चित्रपटगीतांवर आधारित कार्यक्रमांच्या माध्यमातून निधी संकलन करण्यात येत आहे. विविध क्षेत्रांतील नामवंत कलाकारांनी या उपक्रमात सहभागी हाेण्याची तयारी दर्शवल्याने सांस्कृतिक क्षेत्रातून या सामाजिक कार्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत लावणी कलावंत महासंघाने लावण्यसाेहळ्याचे आयाेजन केले हाेते. या कार्यक्रमात कविता घडशी, आकांक्षा कदम, विद्या सदाफुले, गाैरी जाधव, माेना गावडे, वर्षा दर्पे आणि हर्षला राऊत यांच्यासह विविध कलाकार सहभागी झाले हाेते. यातून जमा झालेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आला.