हॉटेलमधील जेवण पुन्हा महागणार; पदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ !

    05-Nov-2026
Total Views |

Hotel 
बंगळुरू, 4 नाेव्हेंबर (वि.प्र.) :
हाॅटेल आणि रेस्टाॅरंटमध्ये जेवण करणे आता आणखी महागणार आहे. दूध, व्यावसायिक गॅस सिलिंडर, भाजीपाला आणि इतर कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने पुणे, मुंबई आणि बंगळुरूमधील हाॅटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांच्या दरात 10 ते 15 टक्के वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.
 
वाढत्या खर्चामुळे हाॅटेल व्यवसाय आर्थिक दबावाखाली आला आहे. दुधाच्या वाढत्या किमतींमुळे हाॅटेल व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. कर्नाटकात नंदिनी दुधाचा दर प्रतिलिटर आठ रुपयांनी वाढून 54 रुपयांवर पाेहाेचला आहे.
 
मुंबईत घाऊक दुधाच्या दरात नऊ रुपयांची वाढ झाली. अमूल आणि मदर डेअरीनेही प्रतिलिटर दाेन रुपयांची दरवाढ केली आहे.
त्यामुळे चहा, काॅफी, मिठाई आणि नाश्त्याचे पदार्थ महागण्याची शक्यता आहे.
 
पश्चिम आशियातील संघर्षामुळे व्यावसायिक एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अनेक शहरांमध्ये 19 किलाेच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत वर्षभरात 70 ते 80 ट्न्नयांनी वाढली आहे. त्यामुळे हाॅटेल व्यावसायिकांना खर्चाचा माेठा भार सहन करावा लागत आहे.
 
सप्टेंबरमध्ये खाद्यपदार्थांची महागाई 7.74 ट्न्नयांवर पाेहाेचली. कांद्याच्या किमती वर्षभरात दुपटीहून अधिक वाढल्या. साखर 29.8 टक्के, तांदूळ 8.25 टक्के आणि चिकन 8.41 ट्न्नयांनी महागले. खाद्यतेलाच्या किमतीतही 9.87 टक्के वाढ नाेंदवण्यात आली. नॅशनल रेस्टाॅरंट असाेसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे शाखेनेही दरवाढीची शक्यता व्यक्त केली आहे. कच्च्या मालाच्या किमती वेगाने वाढत असल्याने पुढील आठ ते दहा दिवसांत खाद्यपदार्थांच्या दरात 10 ते 15 टक्के वाढ हाेऊ शकते, असे पुणे शाखेच्या प्रमुख सायली जहागीरदार यांनी सांगितले.