शास्त्रानुसार, शरीरासाठी हानिकारक असलेले अन्नाचे पदार्थ एकत्र खाणे. यामुळे शरीरात वात, पित्त आणि कफ यांमध्ये असमताेल निर्माण हाेताे आणि पचनक्रिया बिघडू शकते. अपचन हाेते, आणि विविध आराेग्य समस्या उद्भवू शकतात. विरुद्ध अन्न ला अहितकर मानले गेलेले आहे.यामध्ये काही विशिष्ट पदार्थांचे एकत्र सेवन किंवा विशिष्ट परिस्थितीत काही पदार्थांचे सेवन करणे आराेग्यासाठी हानिकारक मानले जाते.
उदाहरणे : दूध आणि मासे एकत्र खाणे, दही आणि फणस एकत्र खाणे, गरम जेवणानंतर लगेच थंडगार आइस्क्रीम खाणे, मध आणि गरम पाणी एकत्र पिणे, तूप आणि मध समप्रमाणात खाणे.
विरुद्ध आहारामुळे हाेणारे दुष्परिणाम:अपचन, पाेटदुखी, त्वचेचे विकार, ऍलर्जी, शरीरात विषारी पदार्थ साचून राहणे. शुद्ध, सकस आणि सुरक्षित आहार हा प्रत्येकाचा हक्क आहे. जगभरात काेट्यवधी लाेक विविध आजारांनी मृत्युमुखी पडतात.
त्यापैकी 70 टक्के लाेकसंख्येच्या मृत्यूमागे अन्नातून पसरणारे जीवजंतू आणि त्यामुळे हाेणारे आजार कारणीभूत असतात अशा वेळी आपण जर विरुद्ध अन्न घेणे किती हानिकारक आहे हे लक्षात येईल.
असुरक्षित अन्नामध्ये आढळणारे विषाणू, घातक जीवाणू, परजीवी, रासायनिक घटक शरीरावर प्रदीर्घ परिणाम करू शकतात. इतकेच काय तर जगात आढळणाऱ्या 200 हून अधिक व्याधींना आहारच कारणीभूत ठरताे. यात डायरियापासून ते दुर्धर मानल्या जाणाऱ्या कॅन्सरपर्यंत सगळ्याच आजारांच्या मुळाशी असुरक्षित अन्न हे गंभीर कारण ठरत असलयाची चिंताही या अभ्यातातून जागतिक आराेग्य संघटनेने व्यक्त केली आहे.