छत्रपती संभाजीनगर, 4 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सिंथेटिक थलेटिक्स ट्रॅकवर सराव करणाऱ्या मुला-मुलींमधून भविष्यात देशासाठी पदके जिंकणारे खेळाडू घडतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला.
गारखेड्यातील विभागीय क्रीडा संकुलात 400 मीटर सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅक, फुटबाॅल मैदान, स्टेडियम मास्ट (फ्लड लाईट्स) व युवा वसतिगृहाचे लाेकार्पण करताना मुख्यमंत्री बाेलत हाेते. पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार सुहास शिरसाट, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, विभागीय आयु्नत जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गाैडा जी. सी., महापालिका आयु्नत अमाेल येडगे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्यासह लाेकप्रतिनिधी, अधिकारी, क्रीडा प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित हाेते.
लाेकार्पणानंतर नूतन सिंथेटिक ट्रॅकवर मुली व मुलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी क्लॅप देऊन दाेन्ही स्पर्धांना प्रारंभ केला. राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांत सहभागी झालेल्या शहरातील खेळाडूंनी यात भाग घेतला. मुख्यमंत्र्यांनी क्रीडा प्रबाेधिनीतील खेळाडूंशी संवाद साधून त्यांच्यासमवेत छायाचित्रही काढले. विभागीय आयु्नत जी. श्रीकांत व क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना सिंथेटिक ट्रॅकची प्रतिकृती, अजिंठा-वेरूळ शिल्प असलेले सन्मानचिन्ह व त्यांच्या नावाच्या इंग्रजी आद्याक्षरांवर आधारित डीएफ क्रीडा साहित्य संच भेट देण्यात आला.