अमरावती, 4 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
कुमकुम माेहाेड आणि यशदीप भाेगे या धनुर्धरांसह भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू भारती फुलमाळीने आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेल्या उच्च दर्जाच्या कामगिरीमुळे अमरावतीला जागतिक बहुमान मिळाला आहे. स्कूल ऑफ स्काॅलर्स शाळेच्या धनुर्विद्या मैदानातून असेच आंतरराष्ट्रीय स्तरावर या जिल्ह्याचे नाव झळकवणारे खेळाडू तयार हाेतील, असा विश्वास अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्य्नत केला. आंतरराष्ट्रीय धनुर्धर कुमकुम माेहाेडची भेट घेऊन त्यांनी कुमकुमचा सत्कार केला.
निंभाेरा खुर्द भागात स्थित स्कूल ऑफ स्काॅलर्समध्ये नव्याने निर्मित धनुर्विद्या मैदानावर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रशिक्षित तिरंदाज विद्यार्थ्यांनी नेम धरला व औपचारिकरित्या फित कापून धनुर्विद्या मैदानाचे उद्घाटन केले. खासदार डाॅ. अनिल बाेंडे, आमदार सर्वश्री प्रताप अडसळ, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, अग्निहाेत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सचिव सचिन अग्निहाेत्री, शाळेचे मुख्याध्यापक एन. संताेष कुमार आदी उपस्थित हाेते.
जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या आंतरराष्ट्रीय कीर्तीची धनुर्धर कुमकुम माेहाेडच्या घरी जाऊन बावनकुळे यांनी कुमकुमचा सत्कार केला. बावनकुळे यांनी कुमकुमशी अनाैपचारिक गप्पा मारल्या व तिरंदाजीतील तिच्या प्रवासाविषयी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील यशासह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील यशाबाबत माहिती जाणून घेतली. ऑलिंपिक स्पर्धेतही कुमकुमने यश मिळवून देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्य्नत करून बावनकुळे यांनी तिला शुभेच्छा दिल्या.