श्री दासबोध नित्यपाठ

सर्व भूतांचेनि संयोगे। सुख दुःख उपजो लागे, आदिभूतिक ।।२।।

    05-Nov-2026
Total Views |
 
RamdasSwami
मुंगी, मुंगळा, माशी, मधमाशी, गांधीलमाशी; साप, नाग, विंचू, वाघ, लांडगा, काेल्हा, अशा प्राणी आणि पशूंच्या दंशाने किंवा हल्ल्याने माणूस त्रस्त हाेताे किंवा वेळप्रसंगी मृत्यूही पावताे. पाण्याजवळ गेला तर मगरीसुसरी ओढून नेतात किंवा पाय घसरून नदीत वाहून जाताे किंवा पाेहायला गेला तर बुडून मरूही शकताे. कधी एखादा शत्रू येऊन हातपाय माेडताे, मारहाण करताे किंवा भाेसकताे. कधी विष पाजताे, डाेळे काढताे तर जीवही घेताे.
 
अचेतन वस्तूही ताप देऊ शकतात. घर किंवा भिंती पडून माणूस जायबंदी हाेताे. डाेंगरकड्यावरून पाय घसरून गडगडताे, तर कधी अचानक झाड पडताना त्याच्या खाली सापडताे. कधी निखाऱ्यावर पाय पडून भाजताे तर कधी दगडाखाली हात सापडताे, तर कधी धावताना स्वत:च अडखळून पडताे. कधी घाेडा, उंट, हत्ती वगैरेवरून पडताे. आज हे प्राणी आपण वापरत नाही; पण त्यांच्याऐवजी आलेल्या स्कूटर्स, माेटार सायकल आणि माेटारी व ट्र्नस हे त्यांच्याहीपेक्षा तापदायक ठरू शकतात आणि त्यांच्या अपघाताने हाेणारे दु:ख हेसुद्धा आधिभाैतिकच समजले पाहिजे.
 
म्हणजे ज्या सजीव किंवा निर्जिव वस्तूंचा संग आपण सुखकारक म्हणून करत असताे ताेच ताप हाेण्याची वेळ आली म्हणजे अतिशय तापदायक दु:खदायक व शाेकाकारक ठरू शकताे हे आपण मनाेमन जाणले पाहिजे.
 
- प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299