मुंबई, 3 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदर, शिपिंग, लाॅजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रातील क्षमता जागतिक स्तरावर विस्तारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्याच्या बंदर व सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक संधी उपलब्ध असून, जागतिक गुंतवणूकदारांसाठी सज्ज आहे. राज्यात गुंतवणूक करून उद्याेग उभारावेत आणि जागतिक सागरी अर्थव्यवस्थेतील भारताच्या प्रगतीचे भागीदार व्हावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ काॅमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने चाैथ्या मॅरिटाइम इंडिया काॅन्फरन्स अँड एक्सपाेचे आयाेजन येथे करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन करताना राणे बाेलत हाेते. ‘फिक्की’चे अध्यक्ष विजय शंकर, ध्रुव गाैतम, कॅ. अबुल कलाम आझाद, जवाहरलाल नेहरू पाेर्ट ट्रस्टचे गाैरव दयाल, नेदरलँडचे जेरीवेल हेल्डन, शिपिंग कार्पाेरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विनेश त्यागी, ओडिशा काॅमर्स आणि वाहतूक विभागाचे प्रधान सचिव एन. बी. एच. राजपूत, महाराष्ट्र मेरीटाइम बाेर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बी उपस्थित हाेते.
अमृतकाळात देशाची सागरी क्षमता वाढवण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात राज्याचे याेगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे केवळ उद्याेगांचा विस्तार हाेणार नाही, तर राज्यात राेजगाराच्या नव्या संधीही निर्माण हाेतील. राज्याला देशातील आघाडीचे सागरी व्यापाराचे केंद्र बनवण्याच्या दिशेने ही समीट महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राणे यांनी व्य्नत केला.