तुम्ही भाज्याच खात नसाल, तर हे जरुर वाचा

    04-Nov-2026
Total Views |
 
Vegetables
माणूस शाकाहारी आहे की मांसाहारी, हा वाद न संपणारा आहे. जेव्हा माणूस गुहांमधून राहत हाेता, शिकार करून आणि कंदमुळं खाऊन आपली उपजीविका करत हाेता, त्यावेळी ताे शाकाहार आणि मांसाहार दाेन्ही करत हाेता. पण त्यानंतर भटक्या जीवनशैलीचा त्याग करून ताे शेती करू लागला, एका जागी स्थिरावला, तसा त्याच्या आहारात आपल्या शेतात पिकणाऱ्या अन्नाचा जास्त समावेश हाेऊ लागला. त्यामुळे अर्थातच शाकाहाराकडे त्याचा कल जास्त झाला. याचा प्रभाव त्याच्या शरीरक्रियांवरही पडला आणि त्यामुळे निराेगी जीवन जगण्यासाठी त्याला जे अनेक प्रकारचं पाेषण लागतं त्यासाठी ताज्या भाज्या आणि फळफळावळ यांचा समावेश त्याच्या आहारात असणं आवश्यक बनलं आहे. परंतु भाज्या किंवा फळं यातून त्याला काेणतं पाेषण मिळतं यापेक्षाही त्यांच्यापायी त्याच्या आराेग्याला बाधा आणणाऱ्या काेणत्या घटकांना प्रतिबंध हाेताे, हे पाहणे उपयुक्त ठरेल.
 
ताज्या भाज्या आणि फळं यातून मिळणारी खनिजं, जीवनसत्त्व, अनेक वनस्पतीजन्य रासायनिक संयुगं आणि तंतुमय पदार्थ यांच्यामुळं निकाेप वाढ तर हाेतेच, पण दीर्घकाळ छळत राहणाऱ्या, शरीरक्रिया मधील संतुलन ढळल्यामुळे उमटणाऱ्या व्याधी पासून त्याचा बचाव हाेताे. केवळ आहारातून ही जीवनसत्त्वं आणि खनिजं मिळत असल्यामुळे आहाराव्यतिरिक्त जीवनसत्त्वांच्या गाेळ्या घेण्याची गरज भासत नाही. आपलं वजन प्रमाणात राखण्यासाठीही भाज्यांचा उपयाेग हाेताे, कारण अधिक उष्मांक पाेटात न जाताही पाेट भरणं शक्य हाेतं.
 
भाज्या न खाल्ल्यास हृदयविकार जडण्याची शक्यता वाढीस लागते हे सर्वेक्षणातून सिद्ध झालेलं आहे. भाज्यांमधून व खास करून फळांच्या सालांमधून मिळणारी अँटीऑक्सिडंट तत्त्वं या विकारांपासून संरक्षण देतात. रक्तदाब आटाेक्यात ठेवायचा असेल तर पालक, मेथी यांच्या सारख्या हिरव्या पालेभाज्या, लाल माठ, ब्राेकाेली या सारख्या फुलभाज्या, संत्री, माेसंबी किंवा ग्रेपफ्रूट यासारखी सायट्रस जातीची फळं आहारात असणं आवश्यक आहे.
 
तंतुमय पदार्थांच्या नियमित सेवनामुळे पचनसंस्थेलाही मदत मिळून काेठा साफ राहताे, कारण हे पदार्थ आतड्यांमधून जात असताना पाणी शाेषून घेऊन फुगतात व त्यामुळे आतड्यांचं चलनवलन सुलभ हाेतं. बद्धकाेष्ठाच्या व त्यापायी उद्भवणाऱ्या मूळव्याधी सारख्या इतर विकारांपासून बचाव करतात. ताेंड, घसा, अन्ननलिका किंवा जठर यांच्या कर्कराेगा पासून बचाव करण्यासाठी पिष्टमय पदार्थ ज्याच्यात कमी आहेत अशा लाल किंवा हिरव्या पालेभाज्या, ब्राेकाेली सारख्या फुलभाज्या, लसूण आणि कांदे नियमित सेवन करण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. पुरुषांना उतारवयात हाेणाऱ्या पुरुषग्रंथीच्या कर्कराेगा पासून टाेमॅटाे बचाव करू शकताे. त्यातला लायकाेपेन हा पदार्थ त्यात महत्त्वाची भूमिका बजावताे