दगडूशेठ ट्रस्टतर्फे कात्रजला तिसरे आरोग्य सेवा केंद्र सुरू

जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आंबेगाव खुर्दमध्ये मोफत सुविधा

    04-Nov-2026
Total Views |

Katraj 
पुणे, 3 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
ईश्वराची सेवा केवळ मंदिरातील पूजेपुरती मर्यादित नसून, गरजू माणसाच्या दुःखात सहभागी हाेऊन त्याला आधार देण्यातही ईश्वरसेवेचा भाव सामावलेला आहे.
 
मानवसेवा हीच ईश्वर सेवा या विचारांतून देवमंदिराकडून मानवसेवेच्या महामंदिराकडे वाटचाल करत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाने जय गणेश रुग्णसेवा अभियानाच्या माध्यमातून आराेग्य सेवेचा उपक्रम सुरू ठेवला आहे. या अभियानाचा विस्तार करत आंबेगाव खुर्द (कात्रज) येथे तिसरे माेफत आराेग्य सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
 
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी, काेषाध्यक्ष सुनील रासने, राजेंद्र गावडे, मंगेश सूर्यवंशी, अमाेल चव्हाण, विशाल ढनाळ, अजय माेझर, राजू वायकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते. या केंद्रात तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध आराेग्य तपासण्या आणि उपचार सुविधा माेफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ट्रस्टचे वैद्यकीय विभागप्रमुख राजेंद्र परदेशी व सहकाऱ्यांनी याचे नियाेजन केले आहे.
 
या अभियानांतर्गत यापूर्वी सारसबागेजवळील हिराबाग काेठी आणि धनकवडीतील काशिनाथ पाटीलनगर येथे दाेन आराेग्य सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आता तिसरे केंद्र स. नं. 44/5, गगनगिरी हिल्स, अचल फार्मजवळ, सच्चाई माता मंदिर परिसर, पाण्याच्या टाकीजवळ, आंबेगाव खुर्द, कात्रज येथे सुरू झाले आहे. या केंद्रात माेफत नेत्रतपासणी, माेतीबिंदू शस्त्रक्रिया, विविध प्रकारच्या र्नत तपासण्या, जनरल ओपीडी, औषधाेपचार आणि ईसीजी तपासणीची सुविधा उपलब्ध असेल; तसेच श्रवण क्षमता तपासणी व श्रवणयंत्र वाटप, कृत्रिम अवयव व वैद्यकीय उपकरणांचे वाटप, फिजिओथेरपी, अ‍ॅक्युप्रेशर, अ‍ॅक्युपंचर उपचार आणि लसीकरण अशा सुविधाही दिल्या जाणार आहेत.
 
यासाठी पुणे महापालिका आराेग्य विभागाचे विशेष सहकार्य लाभल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. हे केंद्र राेज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार असून, दर रविवारी बंद राहील. या माेफत आराेग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ट्रस्टच्या 250, बुधवार पेठ, गणपती भवन कार्यालय, पुणे येथे साेमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 020- 24479222 किंवा 020-24430527 या क्रमांकांवर संपर्क साधावा.