जिवंत आवरणासह पर्यावरणपूरक टॉवर

    04-Nov-2026
Total Views |

Melborne 
संध्यानंद.काॅम
मेलबर्नमध्ये यूएयू स्टुडिओद्वारे प्रस्तावित अल्गी टाॅवर काचेच्या भवनांची संकल्पना बदलणारा एक नावीन्यपूर्ण प्रकल्प आहे. हे डिझाइन झाडांच्या सावलीवरून प्रेरित जिवंत बायाे फसाड (इमारतीच्या भिंतीवर वनस्पती वाढविणे) आहे. हा टाॅवर केवळ सावली देताे, असे नाही तर कार्बन डायऑ्नसाइडचे शाेषण करताे. तसेच, नूतनीकरणक्षम ऊर्जेची सुद्धा निर्मिती करताे. हा प्राेजे्नट उष्णता आणि हवामान बदल यांच्या वाढत्या प्रभावाला लक्षात घेऊन तयार केला आहे.
 
पारंपरिक काचेच्या भिंती सूर्याच्या उष्णतेला आत येऊ देतात, त्यामुळे कूलिंगची गरज वाढते. अल्गी टाॅवरमध्ये याच्या उलट रिस्पाॅन्सिव्ह फसाड सिस्टिम आहे. म्हणजेच फाेटाे-बायाे-रिअ‍ॅ्नटर तंत्रज्ञानावर आधारित ही ‘जीवित त्वचा’ इमारतीच्या भिंतींवर सूक्ष्म शैवालाला वाढण्याची संधी देते. उन्हाळ्यात ते दाट हाेऊन अधिक सावली देते. बायाेबास वाढविते आणि कूलिंग लाेड कमी करते. हिवाळ्यात ते पारदर्शक हाेते ज्यामुळे ऊन आत येते.