कल्याण, 2 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
दिवाळीत दुकानदार, खासगी आस्थापना, विकासक आपले कार्यालय, दुकाने, गृहप्रकल्पांसमाेरील झाडांवर विद्युत राेषणाई करून वृक्षांना हानी पाेहाेचवतात. अशाप्रकारे राेषणाई करणे कायद्याने गुन्हा आहे. न्यायालयाने अशाप्रकारच्या राेषणाईला प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे दिवाळीत झाडांवर विद्युत राेषणाई हाेऊ नये यासाठी कल्याण-डाेंबिवली महापालिकेने प्रभागवार विशेष कारवाई पथक तयार केले आहे.
अशाप्रकारे वृक्षांना इजा पाेहाेचवणाऱ्यांवर कठाेर कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधितांवर फाैजदारी कारवाई केली जाईल, अशी माहिती कल्याण-डाेंबिवली पालिका उद्यान विभागाचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिली.
दिवाळीच्या काळात आनंदाच्या भरात दुकानदार, खासगी आस्थापना, विकासक आपल्या गृहप्रकल्पांसमाेरील झाडांवर विद्युत राेषणाई करतात. यामुळे झाडांवरील पक्षी आणि इतर जैवविविधतेच्या अधिवासाला धाेका निर्माण हाेताे.
झाडांवरील या विद्युत राेषणाई आणि वृक्षप्रदूणाची न्यायालयाने गंभीर दखल घेऊन आपल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठाेर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कल्याण-डाेंबिवली पालिकेने राेषणाईमुळे हाेणारे प्रदूषण राेखण्यासाठी कठाेर उपाययाेजना केल्या असून, विशेष कारवाई पथके तयार केली आहेत.
कल्याण, डाेंबिवली शहरात काेणीही विद्युत राेषणाई करून वृक्षांना हानी पाेहाेचविण्याचा प्रयत्न केला, याबाबतच्या तक्रारींचे प्रभागस्तरावर निराकरण करण्यासाठी दहा प्रभाग कार्यालयांत उद्यान निरीक्षक कार्यरत असतील. प्रभाग साहायक आयु्नत व अतिक्रमण नियंत्रण पथकातील कामगारांनी; तसेच झाडांवर केलेली विद्युत राेषणाई तात्काळ काढून टाकण्यासाठी व आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.
या कारवाईत काेणाही आस्थापनाने अडथळा आणला तर त्यांच्यावर फाैजदारी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात अशी कारवाई टाळण्यासाठी प्रत्येक आस्थापनाने आपल्या दुकान, आस्थापनेसमाेरील वृक्षांवर विद्युत राेषणाई करू नये, असे आवाहन उद्यान विभागाने केले आहे.