ठाण्यात आता दर बुधवारी २४ तास पाणी बंद

दहा टक्के कपातीच्या निर्णयाची महापालिकेकडून अंमलबजावणी

    03-Nov-2026
Total Views |
 
TMC
ठाणे, 2 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
सरकारने लागू केलेल्या दहा ट्नके पाणी कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी ठाणे महापालिकेने सुरू केली. त्यानुसार ठाणे, घाेडबंदर व वागळे इस्टेट भागांचा पाणीपुरवठा दर बुधवारी 24 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. ठाणेकरांना आधीच अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत असताना आता पाणीकपातीमुळे शहरातील पाणीसंकट अधिक गडद हाेण्याची चिन्हे आहेत. कळवा, दिवा व मुंब्रा परिसरात आठवड्यातून एकदा 36 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियाेजन करण्यात आले आहे.
 
ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या अनेक भागांत अपुरा व अनियमित पाणीपुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियाेजन करण्यासाठी राज्य सरकारने दहा ट्नके पाणीकपात लागू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्याेगित विकास महामंडळाकडून हाेणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात लागू झाल्याने कळवा, दिवा व मुंब्रा परिसरात आठवड्यातून एकदा 36 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियाेजन करण्यात आले आहे.
 
त्यापाठाेपाठ ठाणे महापालिकेची स्वतःची पाणीपुरवठा याेजना व स्टेम कंपनीमार्फत हाेणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10 ट्नके कपात करण्यात आली असून, पालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याचे नवे नियाेजन आखले आहे. यानुसार ठाणे शहर, घाेडबंदर आणि वागळे इस्टेट परिसरात राेज 10 ट्नके कमी पाणी देण्याऐवजी दर बुधवारी 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या पर्यायावर शिक्कामाेर्तब करण्यात आले. संभाव्य पाणीटंचाईचा परिणाम कमी करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचा जपून वापर करणे आवश्यक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.