श्री दासबोध नित्यपाठ

ऐसा आध्यात्मिक ताप। सांगता सरेना अमूप ।।२।।

    03-Nov-2026
Total Views |

RamdasSwami 
पण त्या कंपन्यांनाही शरीराची पराधीनता परिणामकारक रीतीने सांगता येणार नाही इत्नया प्रभावीपणे श्रीसमर्थ ती मांडताना पाहून त्यांच्या प्रतिभेचा आदर दुणावताे.
 
शरीरप्रकृती धडधाकट असताना एवढे राेग आहेत आणि त्यातील काेणताही आपल्यालासुद्धा केव्हाही हाेऊ शकताे. ही केवळ जाणीवच माेठी यातनादायक व दु:खाची असते. ही जाणीव देण्यासाठीच श्रीसमर्थांनी या समासाची याेजना केली असावी. कारण ही जाणीव झाली म्हणजेच शरीराहून वेगळे असे चिरंतन सुख काय आहे हे शाेधण्याच्या प्रयत्नाला आपण लागू शकू हा त्यांचा विश्वास आहे.या समासाचा उपसंहार करताना श्रीसमर्थ म्हणतात की, या राेगांची आपल्याला काळजी लागते आणि त्यापासून हाेणाऱ्या दु:खाने आपले चित्त व्याकुळ हाेऊन जाते. जर हे राेग नसतील तरी ते केव्हातरी हाेतील ही चिंताही दु:खदायकच असते. असे अनेक राेग, दु:खे, जखमा आणि त्यांचे भाेग यांमुळे सदैव दु:ख हाेत असते. बरे, असे राेग सुदैवाने चुकले तरी प्रत्येकाला शेवटी म्हातारपण तर येतेच आणि मग शरीर अशक्त व क्षीण हाेऊन जातेच जाते आणि या वृद्ध हाेण्यावर काहीही इलाज नसताे.
 
थाेड्नयात पूर्वजन्मी किंवा या जन्मात पूर्वी केलेल्या पापांचा आणि चुकांचा आध्यात्मिक ताप हा परिणाम म्हणावा लागेल आणि त्याचे कितीही वर्णन केले तरी ते कमी पडेल असा ताे न संपणाऱ्या दु:खांचा समुद्र आहे. तस्मात् शरीराचे अनित्यपण व परावलंबीपण जाणून आपण देहाचे ममत्व कमी करत शेवटी साेडून द्यावे हेच श्रीसमर्थांना सांगावयाचे आहे!
 
- प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299