अॅलर्जीत खाजवल्यामुळे आराम मिळण्याची कारणे

    03-Nov-2026
Total Views |
 
Health
मच्छर चावल्यामुळे वा अ‍ॅलर्जीमुळे खाजवावेसे सर्वांनाच वाटते. आणि हे अत्यंत आरामदायकही वाटते. पण खाजवल्याने एवढा आराम का मिळताे? सायन्स पत्रिकेत प्रकाशित उंदरांवर झालेल्या एका अध्ययनानुसार खाजवल्यामुळे फक्त आरामच मिळत नाही तर हे शरीराची प्रतिकारक्षमता प्रणालीही सक्रिय हाेते जे त्वचेला संक्रमणापासून वाचवण्यास मदत करते.आतापर्यंत असे मानले जात हाेते की, खाजवल्यामुळे त्वचेतून जंतू वा अ‍ॅलर्जीजनक सारखे बाह्य तत्त्व हटवले जाते. पण वैज्ञानिकांना संशय हाेता की यामागे काही इतर कारणही असू शकते.
 
कारण कित्येकदा खाज तेव्हाही टिकून राहते जेव्हा खरे कारण दूर झालेले असते. हे पारखण्यासाठी संशाेधकांनी उंदरांना एका सिंथेटिक अ‍ॅलर्जीकारक संपर्कात आणले. ज्यामुळे त्यांच्या त्वचेवर अ‍ॅलर्जी प्रतिक्रिया झाली. जेव्हा उंदरांनी खाजववले तेव्हा त्यांच्या त्वचेत सूज आली आणि तिथे माेठ्या संख्येत न्यूट्राेफिल्स(एक प्रकारच्या प्रतिरक्षात्मक पेशी) गाेळा झाल्या. गमतीची गाेष्ट म्हणजे ज्या उंदरांना खाजवण्यापासून राेखले गेले, त्यांच्यात सूज व प्रतिरक्षा खूप कमी राहिली. अर्थात खाजवणे फक्त जळजळ मिटविण्याची पद्धत नसून शरीराच्या प्रतिरक्षा प्रणालीचा एक भागही असू शकते.