आयएनएस गुलदार प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार

सिंधुदुर्गच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने दोन श्रेणींत मारली बाजी

    03-Nov-2026
Total Views |

Sindhudurg 
सधुदुर्गनगरी, 2 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख देणाऱ्या आयएनएस गुलदार अंडरवाॅटर म्युझियम प्रकल्पाला केंद्राचा मानाचा ‘गाेल्डन बनियन अवाॅर्ड’ जाहीर झाला. दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या साेहळ्यात केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धाेडमिसे व प्रादेशिक अधिकारी दिलीप माने यांनी हा सन्मान स्वीकारला. द वीक हेरिटेज अवाॅर्ड्स-2026 मध्ये बेस्ट इनाेव्हेशन आणि बेस्ट क्रिएटिव्ह कॅम्पेन या दाेन श्रेणींमध्ये सिंधुदुर्गच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने बाजी मारली आहे. नाैदलात 38 वर्षे सेवा बजावलेली निवृत्त आयएनएस गुलदार युद्धनाैका निवती राॅक्स परिसरात समुद्राखाली बुडवून तेथे कृत्रिम प्रवाळभित्ती आणि संग्रहालय उभारले जात आहे. एमटीडीसी आणि नाैदलाच्या सहकार्याने सुमारे 46.91 काेटी रुपये खर्चून हा प्रकल्प साकारला जात आहे. या ऐतिहासिक प्रकल्पामुळे स्कूबा डायव्हिंग, स्नाॅर्कलिंग आणि साहसी सागरी पर्यटनाला चालना मिळून काेकणच्या पर्यटन वैभवात मानाचा तुरा राेवला गेला. सागरी जैवविविधतेचे संवर्धन करणाऱ्या या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर राेजगाराच्या नव्या संधी उपलब्ध हाेणार आहेत. मार्च 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियाेजन असून, पुढील 10 वर्षांत किमान 800 तरुणांना प्रत्यक्ष राेजगार मिळण्याचा अंदाज प्रशासनाने व्य्नत केला आहे. देशातील अशाप्रकारच्या पहिल्याच उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे उदयास येणार आहे.