नाशिक, 2 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
गाेदावरीचे प्रदूषण राेखून नदीत पर्यावरणपूरक जलप्रवाह कायम राखण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि कालबद्ध पद्धतीने आवश्यक उपाययाेजना कराव्यात. नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची नियमित तपासणी करावी; तसेच शहरातील भूजलसाठ्यांत क्राेमियम आढळलेल्या भागांतील प्रदूषणाची व्याप्ती निश्चित करून त्यावर प्रभावी उपाययाेजना कराव्यात, असे निर्देश विभागीय आयु्नत डाॅ. प्रवीण गेडाम यांनी दिले.
विभागीय आयु्नत कार्यालयात गाेदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक डाॅ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत गाेदावरीतील पर्यावरणीय जलप्रवाह, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, औद्याेगिक प्रदूषण, भूजलातील क्राेमियमचे प्रमाण, नदीपात्रातील पाणवेली, पूररेषेतील अनधिकृत बांधकामे; तसेच पर्यावरणपूरक विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी महापालिका, जलसंपदा, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध यंत्रणांचे प्रमुख तसेच राजेश पंडित, निशिकांत पगारे, जगबीर सिंग हे अशासकीय सदस्य उपस्थित हाेते. गाेदावरी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमित तपासणी करावी. नाशिक शहरातील अंबडसह काही भागांतील बाेअरवेलच्या पाण्यातही क्राेमियमचे प्रमाण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर क्राेमियम उत्सर्जित करणाऱ्या कंपन्यांची महिनाभरात शंभर ट्नके तपासणी पूर्ण करावी.