'जेन-झी'च्या आंदोलनांना ब्रँड्सनाही पाठिंबा द्यावा लागतोय

    03-Nov-2026
Total Views |

GenZ 
संध्यानंद.काॅम
ब्रँड्स वापरतात ‘जेन-झी’ ची भाषा भारतीय ब्रँड्सनी 14-29 वयाेगटातील तरुण पिढी, म्हणजेच ‘जेन-झी’ ची भाषा, साैंदर्यदृष्टी आत्मसात करण्यास सुरूवात केली आहे. ‘नायका’ आणि ‘स्विगी इन्स्टामार्ट ब्रँड’ने अलीकडेच ‘बाल्ड विच’ सारख्या ट्रेंड्सचा फायदा घेतला. टिंडर ब्रँडने ‘सिचुएशनशिप’, ‘मेन-कैरेक्टर एनर्जी’ सारख्या संज्ञा स्वीकारल्या. फास्टट्रॅकने ‘यू डू यू’माेहिमेद्वारे प्रवाही ओळखींचा उत्सव साजरा केला.
 
खरं तर, 1960 च्या दशकात पेप्सीने ‘पेप्सी जनरेशन’ माेहीम सुरू केली हाेती. त्यात त्यांनी युवा संस्कृतीची केवळ साैंदर्यदृष्टी उसनी घेऊन जाहिराती करून प्राॅड्नट विकले. पण, आजचे ब्रँड्स युवांच्या खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत.
 
सध्या 37.7 काेटी लाेकसंख्या असलेली व अंदाजे 81 लाख काेटी रुपये खर्च करण्याची क्षमता असलेल्या ‘जेनझी’ला आपल्या आर्थिक सामर्थ्याची पूर्ण जाणीव आहे. दिल्लीच्या जंतरमंतर येथील आंदाेलनात ‘गेट रेडी विथ मी’ सारखे व्हिडिओ केले. पाेलिसांच्या हिंसेचे फुटेज गेमिंगच्या प्रतिमांसाेबत एकत्र करून साेशल मीडियावर दाखवून जणू स्वतःचीच पटकथा स्वतःच लिहिली. या माध्यमातून युवांनी आपली ताकद दाखवली.
 
नायकी ब्रँड्ने ‘काॅलिन कॅपनिक’ माेहिमेद्वारे सातत्याने वांशिक न्यायावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे, या माेहिमेला अंदाजे 1,550 काेटींची प्रसिद्धी मिळाली आणि विक्रीत माेठी वाढ झाली. पण, जर हे संतुलित नसते, तर माेहिमेत ताेटा हाेऊ शकला असता. फाॅस्टाे, करवी सारख्या ब्रँड्सनी प्रचारात्मक उपक्रम थांबवून प्रतीकात्मक एकता दर्शविली. भारतातही जंतरमंतरवरील युवांच्या आंदाेलनात ब्लू टाेकाईच्या जनपथ आउटलेटने पाेलिसांच्या हिंसाचारादरम्यान आंदाेलकांना आश्रय दिला.